खेळाच्या सरावासाठी विभागीय क्रीडा संकुल खुले – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

30

🔸विविध क्रीडा प्रकारच्या खेळाडूंशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

🔹राष्ट्रीय मतदार दिवसांची खेळाडूंसोबत घेतली शपथ

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.25जानेवारी):- कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विभागीय क्रीडा संकुल नऊ महिने बंद होते, परंतु आता काही अटी व शर्तींच्या अधीन राहून विविध खेळांच्या सरावासाठी विभागीय क्रीडा संकुल खुले केल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. त्याचबरोबर पोलिस, आर्मी भरतीतील प्रशिक्षणार्थी खेळाडूंसाठी विशेष साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. इतर क्रीडा प्रकारातील खेळाडूंसाठीही सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

विभागीय क्रीडा संकुलात श्री. चव्हाण यांच्याहस्ते फीत कापून विभागीय क्रीडा संकुल खुले करण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, विद्यापीठ सिनेट सदस्य फुलचंद सलामपुरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू डॉ.मकरंद जोशी, डॉ. उदय डोंगरे, अंजली सिरसिकर, रणजित पवार, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, राष्ट्रीय विक्रमवीर खेळाडू साक्षी चव्हाण आदींसह प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी खेळाडू आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संपूर्ण क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान श्रीमती मोराळे, श्रीमती नावंदे यांनी क्रीडा संकुलातील साधनसुविधा आणि इतर करावयाच्या साधन सुविधेबाबत सविस्तर माहिती दिली.

श्री. चव्हाण यांनी यासंदर्भात क्रीडा विभागाने आवश्यक त्या बाबींचे तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. क्रीडा संकुलातील भारोत्तोलन, बास्केट बॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्केटिंग, व्यायाम शाळा, तलवार बाजी, स्क्वॅश, जिम्नॅस्टिक, मुष्टीयुद्ध, क्रिकेट आदी क्रीडा प्रकारांच्या सभागृहांना श्री. चव्हाण यांनी भेटी देऊन येथील खेळाडूंशी संवाद साधला. त्यांच्या कलागुणांचे कौतुकही केले.
सुरुवातीला श्रीमती मोराळे यांनी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर गुणवंत खेळाडूंचे कौतूक श्री. चव्हाण यांनी करत विविध क्रीडा प्रकारांना भरीव मदत करण्यात येईल, असे सांगितले. तसेच श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत खेळाडूंसोबत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शपथ घेण्यात आली.

या कार्यक्रमास प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, अथलेटिक्सचे गणेश पवार, भारत्तोलनचे दीपक रुईकर, लॉन टेनिसचे आशितोष शर्मा, बास्केट बॉलचे रणजित दरोगा, स्केटिंगचे भिकन आंबे, टेबल टेनिसचे सचिन पुरी, तलवार बाजीचे स्वप्नील तांगडे, सागर मगरे, स्क्वॅशचे रोहिदास गाढेकर, जिमनॅस्टिकच्या रणजित पवार, बॅडमिंटनचे श्री. खान, बॉक्सिंगचे राहुल टाक, बेसबॉलचे संतोष अवचार, योगाच्या उमा सरवदे, हॉकीच्या इमरान, क्रिकेटचे विनोद माने, भूषण नावंदे, सॉफ्टबॉलचे सचिन बोर्डे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, चंद्रशेखर घुगे, क्रीडा मार्गदर्शक तनुजा गाढवे, गणेश पवार, सदानंद सवळे, श्रीनिवास मुरकुटे, विनोद बारोटे, विजय गुसिंगे, दिनेश मिसाळ, अनिल दांडगे, दीपमाला मोरे, संतोष अवचार आदींची उपस्थिती होती.