26 जानेवारी रोजी नाभिक समाजाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू व रक्तदान शिबीराचे आयोजन

29

🔹ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रीताताई दिपक उराडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.25जानेवारी):- येथील नाभिक युवा आघाडी व नाभिक महिला आघाडी यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम, रक्तदान शिबिर व स्नेहमीलन कार्यक्रम, जीवाजी महाले व वीर भाई कोतवाल पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रीताताई दिपक उराडे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष सौ. वनिताताई ठाकुर, नगरसेविका सौ. लताताई ठाकुर, सौ. सूनिताताई तिडके, सौ. सरीताताई पारधी, श्रीमती निलीमाताई सावरकर, श्रीमती वनिताताई अलगदेवे, सौ. रुपालीताई रावेकर, सौ. अर्चनाताई खंडाते, सौ. अंजलीताई उरकुडे, सौ. पुष्पाताई गराडे ह्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या सर्व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे आयोजन संत नगाजी महाराज देवस्थान कहाली-खंडाळा रोड येथे 26 जानेवारी रोजी केले आहे.
यामध्ये सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिर, दुपारी 1 वाजता जीवाजी महाले व वीर भाई कोतवाल पुण्यतिथी कार्यक्रम, दुपारी 1-30 वाजता हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.तरी सदर कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने करण्यात आली आहे.