बरबड्यातील कु. पुजा गंगाधर भुसलवाड सैन्य दलात भरती बरबडा गावची शान वाढवली

    108

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नायगाव(दि.26जानेवारी):- तालुक्यातील बरबडा गावाची कु.पुजा गंगाधर भुसलवाड यांची आसाम रायफल्स मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम.मुलगी सैन्य दलात जॉईन होने ही वाटते तेवढी साधी,सोपी गोस्ट नव्हे तर त्यासाठी खूप कष्ट-परिश्रम घ्यावे लागतात. त्यासाठी खूप परिसीमा पार कराव्या लागतात. त्या सर्व अडचणी दूर सारत कु.पूजा आज या यशाच्या शिखरावर पोहचली आहे त्यात तिला तिच्या आई-वडिलांची खंबीर साथ होती. म्हणून श्री.गंगाधर भुसलवाड व आई सौ. प्रेमला गंगाधर भुसलवाड यांचे सुद्धा अभिनंदन करावे तेवढे कमीच आहेत.त्याच अनुषंगाने कु.पूजा भुसलवाड यांचा जाहीर सत्कार सोहळा बरबडा गावातील प्रतिशिष्टीत नागरिक यांच्या हस्ते कु.पूजा गंगाधर भुसलवाड यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

    सौ. अंजनाताई बालाजी मदेवाड (पंचायत समिती सदस्य नायगाव)पुजाताई पांडुरग एडके ग्रामपंचायत सदस्य, बालाजी मदेवाड माजी सरपंच,मधुकर घोसलवाड, पी. जी. रूद्रवाड सर, ग्रा.सदस्य बालाजी घोसलवाड, ग्रा. सदस्य बाबुराव इंद्रवाड , ग्रा. सदस्य माधव कोलगाने, दत्ता पा. ढगे, जयशिंग नागधरे, संजय नेरवाड, बालाजी पाशेमवाड, बालाजी वटपलवाड,सतिशकुमार हनमंते गावातच नव्हे तर आमच्या संपूर्ण परिसरातील विध्यार्थ्यांसाठी कु.पूजा भुसलवाड यांनी एक आदर्श निर्माण केला आहे भविष्यात गावातील इतर विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी कु.पूजा भुसलवाड यांचा आदर्श नक्कीच घ्यायला हवा.