शिवसेना कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात अनेक व्यक्तीचा पक्ष प्रवेश

41

🔹चिमुर क्रांति जिल्ह्यासाठी शिवसेना कटिबद्ध-नितीन मत्ते

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.30जानेवारी):-तालुका शिवसेना च्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते यांच्या मार्गदर्शनात हुतात्मा स्मारक येथे शिवसेना कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील अनेक व्यक्तीनी शिवसेनेत प्रवेश घेतला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख नितिन मते, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, ब्रम्हपूरी उपतालुका प्रमुख केवळराम पारधी, वरोरा उपतालुका प्रमुख लक्ष्मण ठेंगणे आदी शिव सैनिक उपस्थीत होते.

कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील विद्या घुगुस्कर, ज्योती कोडापे ,संगीता जीवतोडे, दिनेश संघेल, माया जांभूळे, ताराचंद राऊत, शैला पाटील, गोरखनाथ मेश्राम, नरेश मोहीनकर, योगेश मेश्राम, सुनिल कुळसंगे, सरीता बघेल, नामदेव खोबरे आदीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश घेतला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्रीहरी सातपुते, संचालन रोशन जुमडे यांनी केले. आभार किशोर उकुंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी अनंता गिरी, आशीष बगुलकर, विशाल बोकडे, संतोष जुमडे, विलास मेश्राम, नितेश आडे शंकर घोडमारे, कमलाकर बोरकर, विलास कानझोडे, मोरेश्वर पोइंनकर, अरुण पिसे आदीनी प्रयत्न केले.
,,…………………………………

चिमूर नगर परिषद निवडणूक शिवसेना सर्व ताकतीने लढविणार –
चिमूर नगरपरिषद झाली तेव्हा पासुन अनागोंदी कारभार सुरु आहे शहरातील रस्ते नाली पाणी समस्यासह नागरिकांना मिळनार्‍या मुलभूत पायाभूत सुविधा मिळत नाही नगर परिषदेत काम करनाऱ्या कष्ठकरी सफाई कामगारांना शासनाने ठरवुन दिल्या प्रमाने त्यांच्या हक्काची मजूरी योग्य मिळत नाही ठेकेदाराची मनमानी सुरु आहे नगर परिषद या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही या संदर्भात ५ फेब्रुवारी ला नगरपरिषद समोर आंदोलन व मुख्याधिकारी ला घेराव घालनार असुन चिमूर नगर परिषदच्या होवु घातलेल्या निवडणूकीत सतरा प्रभागात शिवसेना उमेदवार उभे करून सर्व ताकतीनीसी लढनार असल्याची माहीती शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते यांनी कार्यक्रमादरम्यान दिली,

,,,,,………………………………
चिमुर क्रांति जिल्ह्यासाठी शिबसेना कटिबद्ध,

चिमुर ही क्रांति भूमि असून हिन्दुस्थानातिल सर्वात आधी स्वतंत्र होणारे शहर आहे, भौगोलिक दृष्टया क्षेत्रफलाने मोठे असून सर्वात जूनी मांगनी चिमुर जिल्ह्याची आहे, त्यामुळे शिबसेना चिमुर जिल्ह्यासाठी आम्ही मुख्यमंत्रयाना प्रस्ताव सादर करून चिमुर जिल्ह्याची मांगनी रेठुन धरु असे वक्तव्य जिल्ह्य प्रमुख नितिन मत्ते यानी व्यक्त केले