शिक्षक भारती विशेष शाळा,कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत

    51

    ?महेश भगत यांची जिल्हाध्यक्षपदी तर रामदास कामडी यांची सचिवपदी नियुक्ती

    ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.1फेब्रुवारी):-शिक्षक भारती विशेष शाळा,कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी चंद्रपूर जिल्हा सहविचार सभा चंद्रपूर येथील गौरव सेलिब्रेशन लॉनच्या सभागृहात संपन्न झाली.या सहविचार सभेत चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांगाच्या अनेक विशेष शाळा,कर्मशाळा आहेत.या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्या आहेत.या समस्यांचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्यात सक्षम अशी एक संघटना असावी या उद्देशाने शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे कार्यावर विश्वास ठेवून शिक्षक भारती विशेष शाळा,कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची जिल्ह्यात मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सहविचार सभेचे अध्यक्ष शिक्षक भारती नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे होते. प्रमुख अतिथी विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,खाजगी प्राथमिक शिक्षक भारतीचे राबिन करमरकर,जिल्हा संघटक विलास फलके उपस्थित होते.रामदास कामडी यांनी प्रास्ताविकातून दिव्यांग कर्मचारी वर्गाच्या समस्या मांडल्या तसेच जिल्ह्यात संघटना स्थापन करण्याचा उद्देश कथन केला. यानंतर नवनियुक्त कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

    उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश डांगे यांनी आमदार कपिल पाटील यांचे कार्य तसेच शिक्षक भारती संघटनेविषयी सविस्तर माहिती दिली.आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर संघटीत होऊन लढा देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुरेश डांगे यांनी केले.शिक्षक भारती विशेष शाळा चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा अध्यक्ष महेश भगत यांची नियुक्ती करण्यात आली.

    सचिवपदी रामदास कामडी यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय भसारकर,कार्याध्यक्षपदी पद्माकर मोरे, कार्यालयीन सचिवपदी कालिदास बलकी,कोषाध्यक्षपदी गिरीधर मसराम, सहसचिवपदी सुहास देवडे,सहकोषाध्यक्षपदी प्रमोद सातपुते,सहकार्याध्यक्षपदी गिरीधर तागडे,प्रसिद्धीप्रमुखपदी रविकांत घोलप यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून विश्वनाथ बनकर,चंदा चंदेवार,सीमा बावणे,साधना माटे,प्रज्ञा नारनवरे, कैलाश कावळे,भूपेन्द्र गरमडे यांचा समावेश आहे.सहविचार सभेला चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळा,कार्यशाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.सहविचार सभेचे संचालन गुलाब शेंडे तर आभारप्रदर्शन गिरीधर तागडे यांनी केले.