आता आणखी काय विकणार आहात?- आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मोदी सरकारला सवाल

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.1फेब्रुवारी):- एअर इंडीया, एल. आय. सी. ला विकण्याचा निर्णय ह्या मोदी सरकारने केला आहे. सरकारी जमीनी विकणार, बीपीसीएल पण सरकार विकणार असून हे सरकार सरकारी मालमत्ता विकणारे मोदी सरकार ठरणार आहे. आता आणखी काय विकायचे शिल्लक आहे अशी खोचक प्रतिक्रिया आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेटवर दिली आहे.

गृहिणी विश्वास ठेऊन आपल्या बजेट मधून पै.. पै .. पैसा जमा करून एल. आय. सी मध्ये गुंतवणूक करीत असतात. परंतु हि एल. आय. सी विकण्याच्या निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. महिला अर्थमंत्री असून या निर्णयाने महिलांना धक्का बसल्याचे बसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.कोरोनामुळे देशात हजारो युवकांचे रोजगार गेले, बेरोजगारांना रोजगार देण्याचे मोदी सरकारने जाहीर केले होते. रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये खास काहीच नसल्याचे दिसून येत आहे. आत्मनिर्भर भारत करणारे मोदी सरकार मात्र महिलांना या अर्थसंकल्पात काही देऊ शकले नाही. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काहीच योजना नसल्याचे दिसून येत आहे.