नक्षत्राचं देणं काव्यमंचची वार्षिक सभा संपन्न – जिल्हाध्यक्ष पदी यवनाश्व गेडकर यांची निवड

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.1फेब्रुवारी):-नक्षत्राचं देणं काव्यमंच या राज्यव्यापी साहित्य मंडळाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी यवनाश्व गेडकर यांची निवड करण्यात आली आहे. मुक्ती फांऊडेशन च्या तुकूम कार्यालयात झालेल्या वार्षिक सभेत सर्वांनुमते त्यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . प्रास्तविक विलासराव उगे यांनी केल्यानंतर देवराव कोंडेकर यांनी यवनाश्व गेडकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असता सर्वांनीच अनुमोदन दिले. याप्रसंगी प्रा. श्रावण बानासुरे , सरिता गव्हारे, मंजुषा खानेकर , अभय घटे , विजय चिताडे आदींनी समयोचित विचार मांडले.

सूत्रसंचालन कवी नामदेव गेडकर यांनी केले तर आभार सचिव नारायण सहारे यांनी मानले. याप्रसंगी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात उपाध्यक्ष म्हणून सरिता गव्हारे, मंजुषा खानेकर तर सचिव म्हणून नारायण सहारे , कोषाध्यक्ष म्हणून नामदेव गेडकर यांची निवड करण्यात आली आहे.

सदस्यपदी विलास उगे, देवराव कोंडेकर ,प्रभाकर आवारी , संजय वैद्य आदींची निवड करण्यात आली आहे.
यवनाश्व गेडकर हे सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक असून त्यांचे नुकतेच असा मी घडत गेलो हा आत्मकथनपर ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. त्यांना स्फुट लेखन व कविता लेखनाचा छंद आहे. तसेच येत्या रविवारी श्रमिक पत्रकार भवनात त्यांचे स्मरणातली निरंजना हे दुसरे पुस्तक पोलिस उप अधिक्षक शेखर देशमुख यांचे हस्ते प्रकाशित होत आहे.