✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.2फेब्रुवारी):- कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे चिकन मटण मार्केटमध्ये सुरू असलेली अवैध दारू विक्री विरोधात त्याच वॉर्डातील महिलांनी आरोपीची अवैध दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा राग मनात धरून ७ ते ८ दारु तस्करांच्या टोळक्यांनी द्वेषबुद्धीने कोरपना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्ष रितिका ढवस यांच्या घरावर लाठ्या,काठ्याने भ्याड हल्ला केला.या हल्ल्यात ढवस परिवारातील सदस्य गंभीर जखमी झाले असुन त्यांना वाचवण्यासाठी धावुन आलेले जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे आणि त्यांच्या मुलाला सुद्धा आरोपींनी बेदम मारहाण करून जखमी केले.
त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे हात दिवसेंदिवस बळकट होत असून दिवसाढवळ्या लोक प्रतिनिधींना मारहाण करून पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छन लावण्याचे काम होत आहे.त्यामुळे या भ्याड हल्ल्यातील अवैध दारूविक्री करण्याऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
यावेळी निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री.वासुदेवभाऊ सौंदरकर यांच्यासमवेत जगदीश पिलारे, रा. यु. काँ. चे जिल्हा सचिव अतुल राऊत, रा. यु. काँ. तालुका अध्यक्ष अश्विन उपासे,रा. यु. काँ. चे शहर प्रमुख पराग बनपुरकर रा. काँ. सा. व न्या. तालुका अध्यक्ष प्रविण (सोनू) गेडाम, अमोल ठेंगरी, राकेश नवलाखे, अभिषेक रोहनकर, आदेश मालोदे, विवेक मिसार, धम्मदीप गेडाम, प्रफुल डोईजड, जितेंद्र कऱ्हाडे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.