पोलीस पुत्राला जीवनदान देण्या साठी मदत करा- पूजाताई उदगट्टे

27

🔹५ वर्षीय पोलीस पुत्राला हृदयाची आवश्यकता!

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.6फेब्रुवारी):-गेल्या 4 महिन्या पासून तो मृत्यूवशी झुंज देत आहे. अगोदर कॅन्सर सारख्या आजाराला त्याने हरवले आता त्याचे हृदय 10 टक्केच काम करत आहे, देव पण परीक्षा घेतोय आपली माणुसकी पुढे आली पाहिजे त्या 5 वर्षाच्या पोलीस पुत्राला जीवनदान देण्यासाठी पुढे या. जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिसांपैकी एक आहेत *मंगलेश रामकृष्ण वसईकर!* या पोलिसाचा ५ वर्षीय सुपुत्र जयनियल याला हृदयाची आवश्यकता आहे. त्याचे तात्काळ हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
जयनियल सध्या मुंबईतील मुलुंड येथे असलेल्या फोर्टीस रुग्णालयात दाखल आहे.

त्याचा रक्तगट ओ पॉझिटीव्ह आहे. एखाद्या सुजान नागरिकाने आपले मरोणोत्तर अवयवदान केले असल्यास अथवा मेंदू मृत (ब्रेन डेड) असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक व नागरिकांनी मदत करा व त्वरित ७२४८९२२९३१, ७७७००६५१००, ९८८१८०३३६१ या क्रमांकांवर संपर्क साधावा. आपली मदत पोलीस पुत्र जयनियल याला जीवनदान देऊ शकते. त्यामुळे कृपया मदत करा, असे आवाहन व हात जोडून विंनती करते. त्या बाळाचे बाबा *मंगेश रामकृष्ण वसईकर,देवांश फाऊंडेशन* व *रयत शेतकरी संघटना* ह्रदय मिळण्या साठी प्रयत्न करत आहे तुम्ही पण आम्हाला मदत करा देशाच्या कानाकोपऱ्यात हा मेसेज पाठवा.

देशातील प्रत्येक पोलीस परिवाराने व नागरिक यांनी आपला मुलगा आहे म्हणून मदत करा पोलीस दलात कर्तव्याला असलेल्या पोलीस नाईक (बक्कल नं. ३०६) मंगलेश रामकृष्ण वसईकर यांनी हे आव्हान केले आहे.सदर पोलीस पुत्राला राज्यशासन,वरिष्ठ पोलीस अधिकारी ,मुख्यमंत्री,व पोलीस दलाचे कुटुंबप्रमुख अनिल देशमुख यांनी मदत करावी, अशी विनंती देवांश फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व रयत शेतकरी संघटना परिवार यांच्या कडून करण्यात येत आहे