करवीर तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

41

🔹ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार : रविवारी वितरण सोहळा

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.7फेब्रुवारी):-६ जानेवारी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून करवीर तालुका पत्रकार संघाचा सन २०२१ चा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर शिंदे यांना जाहीर करण्यात आला असून रविवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भोगावती महाविद्यालय येथे पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती करवीर पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक मेटील (गाडेगोंडवाडी) व उपाध्यक्ष युवराज पाटील (सावर्डे दुमाला) यांनी दिली.

संघाच्या वतीने यावर्षीचे करवीर भूषण उत्कृष्ट पुरस्कार रमेश पाटील ( लोकमत), उत्तम पाटील (पुढारी), सुनिल ठाणेकर ( पुण्यनगरी), राजू पाटील (सकाळ), प्रकाश जाखलेकर ( तरुण भारत), जयवंत निगडे (फोटोग्राफर), कृष्णात निगडे(फोटोग्राफर) यांना जाहीर झाले असून त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह , फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

करवीर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळा , विमा पत्र वाटप , भेटवस्तू वाटप अशा संयुक्त कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील, अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनकर पाटील तर भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौगले म्हाळुंगेकर, ऍड. सी.बी.कोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.