हक्कबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवावी – भास्करराव पेरे पाटील

24

🔸आदर्श गाव पाखरसांगवी येथे भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.12फेब्रुवारी):-लातूर (पाखरसांगवी ) ग्राम पंचायत पाखरसांगवीच्या वतीने आदर्श गाव पाटोदयाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे सर लातूर शहर पोलिस उप अधीक्षक जितेंद्र जगदाळे सर सरपंच कोमल इर्लेवाड उपसरपंच भिमशंकर (राजाभाऊ)लखादिवे देनिक समीक्षा उप संपादक तथा ह्यूमन राइट्स फाऊंडेशन प्रशासकीय संचालक रामेश्वरजी धुमाळ माजी सरपंच शिवदास लखादिवे माजी उप सरपंच साहेबराव देशमुख पोलिस पाटील काकासाहेब देशमुख माजी सरपंच बालाजी कांबळे सिताराम वाघमारे सचिनराव सुर्यवंशी सूनील फुलारी अश्पाक शेख राजकुमार शिंगन उमेश हंडरगुळे ईस्माईल पठाण नितीन कांबळे पांडूरंग उमाप यांच्यासह गावतील शेकडो नागरिकांची उपस्थितीत होती.

या कार्यक्रमचे सत्र संचलन गोविंद केंद्रे यानी तर कार्यक्रमचे प्रस्तावित रामेश्वरजी धुमाळ यानी केले तर आभार प्रदर्शन बालाजी कांबळे यानी केले