स्टोरी मिरर आयोजित ऑथर ऑफ द इयर 2020 पुरस्कार जाहीर

33
✒️अंगद दराडे(बीड प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.13फेब्रुवारी):-भारतातील साहित्य पोर्टलवरील सर्वांत मोठा पुरस्कार म्हणून स्टोरी मिरर ऑथर ऑफ द इयर कडे पहिले जाते. नुकताच 2020 मध्ये पोर्टल वरील उल्लेखनिय साहित्य प्रवास करणाऱ्या साहित्यीकांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहेयामध्ये एडिटर च्वाइस व रीडर च्वाइस या दोन प्रकारात हा पुरस्कार देण्यात आला.

असून रीडर च्वाइस मधील पुरस्कार प्राप्त साहित्यिक , ज्यूली गौदंड, प्रतीक्षा कदम, चंदन पवार ऋचिल खेतले, चारूलता राठी, सुनील सावंत, आम्रपाली चव्हाण, सुरेखा चिकलकर, पंडीत वराडे, ऋतुजा ठाकूर. तर एडिटर च्वाइस मध्ये.संगिता देवकर.मनीषा अवेकर, मीनाक्षी पांचाळे यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार भेटल्याने सर्वाचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे. व स्टोरी मिरर साहित्य टीम कडून देखील शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.