महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची पुणे येथे बैठक

28

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढ आणि विविध मागण्यांवर विचार विनिमय करण्यासाठी त्रिपक्षीय समिती नियुक्त झाली आहे. या समितीची बैठक दि ११ रोजी पार पडली. यानंतर पुढील बैठक ही दि. २०फेब्रुवारीला होणार आहे.
या बैठकीत प्रामुख्याने विविध संघटनानी केलेल्या ४०% वेतनवाढीबाबत चर्चा होणार आहे.

त्या दृष्टीने साखर कारखान्याकडून येणाऱ्या महत्वाच्या सूचना व विनंत्या आणि प्रत्यक्ष कृती अमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी *दि १५/२/२०२१ रोजी ठीक दुपारी २ वाजता साखर संघ कार्यालय, साखर संकुल, शिवाजी नगर, पुणे येथे महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व साखर कारखाना प्रतिनिधीनी सदर बैठकीस कामगारांच्या वेतनवाढी संदर्भातील आपल्या कारखान्याच्या संपुर्ण माहितीस्तव उपस्थित रहावे.