पाण्याच्या वन वनित दोन सख्या बहिणीचा विहिरीत पडून मृत्यू

    36

    ✒️निफाड प्रतिनिधी(विजय केदारे)मो:-9403277887

    दिंडोरी(दि.14फेब्रुवारी):- तालुक्यातील विळवंडी येथे दोन सख्ख्या बहिणी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले असता विहिरीत पाय घसरून पडल्याने दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली      याबाबतचे वृत्त असे की दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील उत्तम विठ्ठल पारधी यांच्या मुली कु  पद्मा उत्तम पारधी (वय 11 वर्ष ) व तिची लहान बहीण कु फशा उत्तम पारधी (वय 9 वर्ष ) या काल सकाळच्या सुमारास विळवंडी शिवारातील राजेंद्र पोपट पारधी यांच्या विहिरीवर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी गेले असता  पाणी काढताना पाय घसरून पडल्याने दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

      याबाबत दिंडोरी पोलिसांना खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला घटनेचा अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण धनंजय  शिलावटे करीत आहे याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून दिंडोरी पोलीस अधिक तपास करत आहे. .रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  उत्तम विठ्ठल पारधी  यांना चार मुली व एक मुलगा असून एक महिन्यापूर्वीच एका मुलीचे गंभीर आजाराने निधन झाले होते आणि दोन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने पारधी कुटुंबावर दोघा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.