परभणी जिल्हा अंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धेत जावेद अन्सारी खुल्या गटातून प्रथम

  34

  ✒️अनिल साळवे(गंगाखेड,प्रतिनिधी)मो:-8698566515

  गंगाखेड(दि.17फेब्रुवारी):- शहरात दिनांक 14 फेब्रुवारी रोजी गोदावरी मंगल कार्यालय या ठिकाणी परभणी जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन यांच्या अंतर्गत गंगाखेड श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 82 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.

  स्पर्धेचे उद्घाटन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष युनूस भाई, सुशांत चौधरी अजमत खान, नगरसेवक सत्यपाल साळवे, शेख चांद हाजी साहब, कृष्णा सोळंके ,सय्यद अजु,शेख अफरोज,इरफान खान शेख जवु हे उपस्थित होते. शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये एकूण 82 स्पर्धकांनु परभणी जिल्हा शरीरसौष्ठव गंगाखेड श्री म्हणून जावेद अन्सारी या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक मिळवला. पंधरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल, पुष्पहार देऊन त्याचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

  दुसरा क्रमांक वसईराम सोनी जिंतूर, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम अकरा रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तिसरा क्रमांक मुंजाजी डोंणे पूर्णा, सात हजार रुपये रोख ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. चौथा क्रमांक इमरान शेख ,पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र अशा विजय स्पर्धकास स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेला प्रशिक्षक म्हणून जफर खान, जावेद अन्सारी ,मोसिन खान, शेख जमील यांनी काम पाहिले.

  ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवनिर्वाचीत आमदार रत्नाकरजी गुट्टे काका मिञ मंडळाचे शहरध्यक्ष शेख खालेद शेख अमीर, फिरोज खान खाजा खान ,जफर खान पीर खान, मुसाभाई कुरेशी, सय्यद अली ,सद्दाम, शेख शरीफ, शेख दस्तगीर, सय्यद मतीन ,शेख पप्पू ,राज भोसले, शेर खान,प्रा. असोरे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन गुणवंत कांबळे यांनी केले तर आभार शेख आलेत यांनी मानले.