नेहरु युवा केद्र तर्फे जलशक्ती अभियान

27

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.17फेब्रुवारी):- जिल्हयातील देवरी येथे नेहरु युवा केद्र तर्फे जलशक्ती अभियान कार्यक्रम देवरी येथे घेण्यात आला. नेहरु युवा केद्रांचे सर्व कार्यकर्ते हे प्रत्येक गावा गावात अभियानाबाबत भुमिका निभवत असून गावातील नागरीकांकडून सुध्दा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. देवरी येथे नव दुर्गाऊत्सव मंडळाचे सहकार्याने 3 दिवशीय बंधारा बाधंण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

गावातील सांडपाणी हे बाहेर न जाता कुठे तरी ते अडुन राहावे यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन हा बधांरा बाधण्यात आला.नेहरु युवा केद्रांचे स्वयंसेवक विवेक वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली मंडळाच्या कार्यकर्ते मेहनत घेऊन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमांचे अध्यक्ष अविनाश राऊत, सचिव चेतन भालेराव .तसेच उपस्थितीत असलेले सर्व सदस्यांनी सहकार्य केले.