गंगाखेड शहरास नाही कोणी वाली म्हणुन गोदावरी पाञातील मातीबंधारा फोडून सोडले पाणी

37

🔺वाळू साठी अखेर फोडलाच- कार्यवाही होणार का ?

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18फेब्रुवारी):-गोदावरी पाञात टाकण्यात आलेल्या माती बंधा-या मुळे गोदापाञात मोठ्या प्रमाणात पाणी आडल्याने गंगाखेड शहरास पाणी टंचाई मात करणारा उपलब्ध साठा होता परंतु वाळू उपसा करण्यास पाण्याचा आडथळा निर्माण होत आसल्याने शुभ चींतकानी चक्क माती बंधाराच आज मंगळवार रोजी जेसीबीने उध्वस्त केल्याची घटना घडल्याने शहरात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होणार आसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोदावरी पाञात गंगाखेड धारखेड पुलाचे काम सुरू आसुन सदरील ठेकेदाराने गोदापाञात माती बंधारा टाकून पाणी आडविले असता.सदरील पाण्याचा फायदा गंगाखेड शहरासाठीच भर उन्हाळ्यात होणार होता.उन्हाळ्याची सुरूवात होताच गोदापाञात नगर परिषदेचा वतीने लाखो रूपये खर्च करून गोदापाञात दरवर्षी माती बंधारा उभारण्यात येतो पण यंदा गंगाखेड-धारखेड पुल निर्मिती करणाऱ्या ठेकेदाराने मोफत मागील महिण्यातच गोदापाञात माती बंधारा टाकून शहरवासीया सुखद धक्का दिला होता.सदरील माती बंधाराने गोदापाञात पाणी साठले होते तर बंधा-यावरून धारखेड सह इतर १४ गावचा वाहतुकाचा प्रश्न सुटला होता पण यांची मोठी गोची निर्माण झाली होती.

माती बंधा-या आडलेल्या पाण्याचा बँक वाटर धारखेड भांबरवाडी सह दुर पर्यत गेल्याने गोदापाञात चहुबाजूने पाणीच पाणी झाल्याने पाञातील बेकायदा वाळू उपसा करण्यास मोठी अडचण निर्माण झाल्याने वाळू उपसा बहुतांशी बंद झाल्यामुळे सदरील माती बंधारा फोडण्याचा हालचाली सुरू केल्या होत्या भाजपाचे शहर अध्यक्ष व धारखेड ग्रामस्थानी तहसिलदार यांना निवेदन देउन गोदावरी पाञातील माती बंधाराचे उन्हाळा संपे पर्यत संरक्षण करून कोणीही फोडू नये अशी मागणी करण्यात आली होती पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर गोदापाञातील माती बंधारा शुभ चींतकाने आज फोडल्याने लाखो लिटर पाणी गोदापाञात वाहुन गेले आहे.माती बंधारा फोडणा-यावर कार्यवाही करण्याची सर्वञ मागणी होत आहे.प्रशासन यावर काय कार्यवाही करते याची चर्चा शहरात होत आहे .