किल्ले शिवनेरी….

26

शिवजयंती निमित्ताने अभिवादन)

….शिवबा….

ही भूमी शौर्याची ! मातृ संस्काराची !
वीर शिवबाची ! शिवनेरी !!

शिवनेरी सूर्य !प्रकाशे विश्वात !
रमे मावळ्यात ! स्वराज्याच्या !!

स्वराज्याचा श्वास ! स्वराज्य तत्वक !
स्वराज्य दीपक ! शिवराजे !!

शिवराजा शूर ! जिजाऊचा बाळ !
पूजती सकळ !विश्वात्मक !!

विश्वात्मक तत्व !मनगटी जोर !
मुठी तलवार ! शिवबाच्या !!

शिवबाची भूमी ! पवित्र जननी !
शिवाईची वाणी ! भासतसे !!

विशाल वाड्यात ! शिवबा हो दंग !
मावळ्याचा रंग ! कीर्तीमान !!

सह्याद्रीचा वाघ ! उच्च मानबिंदू !
आम्ही त्यांना वंदू ! श्रध्दा भावे !!

✒️बंडोपंत बोढेकर ,गडचिरोली
(आनंदभान अभंगसंग्रहातून )