शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची खंडू बोडके-पाटील यांची कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

निफाड(दि.22फेब्रुवारी):-शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गोदाकाठसह निफाड तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने द्राक्ष उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे! त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी *कृषिमंत्री दादासाहेब भुसे* यांच्याकडे *महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य, करंजगावचे मा.सरपंच खंडू बोडके-पाटील* यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निफाडच्या दौऱ्यावर आलेल्या *कृषिमंत्री दादाजी भुसे* यांची पिंपळगाव येथे *मा.आमदार अनिल कदम, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर* यांच्या उपस्थितीत *खंडू बोडके-पाटील* यांनी आज भेट घेतली.

निफाड तालुक्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांना देत शेतकऱ्यांच्या व्यथा खंडू बोडके-पाटील यांनी मांडल्या. तसेच शासनाने तातडीने नुकसानभरपाई देण्याचे साकडे कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले. महाराष्ट्राचे *मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनाही मेलद्वारे* नुकसानभरपाई मागणीचे निवेदन *खंडू बोडके-पाटील* यांनी पाठविले आहे.!