कल्याणे खु. गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

38

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.23फेब्रुवारी):-येथील कल्याणे खु. गावातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तरुण मित्रमंडळ यांच्याकडून प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोविड – १९ च्या नियमांचे पालन करून व फिजीकल डिस्टनसिंग ठेवत नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा खऱ्या इतिहासाचा वारसा जपला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवजयंतीचे औचित्य साधून कल्याणे खु. गावात वैचारिक व्याख्यानातून समाजप्रबोधन करण्यात आले. सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांचा हस्ते माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिवरायांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून पंढरीनाथ बोरसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिश शिंदे यांनी शिवरायांच्या बहुजन हिताय धोरणाची महती वर्णन केली. यावेळी छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष व विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून इतिहासात झालेले दगा – फटके, शिवनितीचे संस्कार, युवक प्रेरणा इ. बाबीवर प्रकाशझोत टाकला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वच्छ चारित्र्य, उत्कृष्ट नियोजन, कुशल संघटक, अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणं या सर्व गोष्टींमधून आजच्या युवकांनी प्रेरणा घेणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले.

याप्रसंगी विचारमंचावर कल्याणे खु. चे सरपंच संदीप बोरसे, बहुजन क्रांती मोर्चा धरणगावचे तालुका संयोजक आबासाहेब वाघ, गावातील जेष्ठ नागरीक भिमसिग पाटील, के. आर. वाघ सर, विनायक महाजन, मोहित पवार, प्रफुल पवार, नामदेव मराठे, संदीप खंडेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अतुल पाटील यांनी मास्क वाटप केले. स्वर साउंड सिस्टीम पिंप्री चे संचालक योगेश चौधरी व सागर चौधरी यांच्याकडून साउंड सिस्टिम तर गुलाब पाटील यांच्याकडून मंडप व्यवस्थेचे सहकार्य लाभले. स्वागत समितीच्या माध्यमातून मान्यवरांचा सत्कार अतुल पाटील, रोहित पाटील, चेतन गुरव, शुभम पाटील, श्रीनाथ साळुखे, शुभम सोनवणे, अनिल पवार, संदीप सोनवणे आदींनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे आयोजन श्रीनाथ साळुंखे (चर्मकार उठाव संघ युवक तालुकाध्यक्ष धरणगाव) आणि अतुल पाटील, अनिल पवार, शुभम सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपद पाटील, पुरुषोत्तम पाटील, गणेश सोनवणे, दीपक थोरात, बापू सोनवणे, शिवाजी लकडे, गावातील युवावर्ग सत्यम पाटील यश पाटील, अमोल लकडे, विश्वजीत पाटील, गणेश धनगर, विश्वास सोनवणे, गोपाल पाटील, चेतन पाटील, संदीप सोनवणे, कमलेश पाटील, मोतिलाल चव्हाण, महिला वर्ग सुनिता पाटील, कल्पना पाटील, सत्यभामा सोनवणे, वैशाली पाटील, केसर पाटील, जसुबाई सोनवणे, कमलबाई साळुंखे अनिता सोनवणे, उषा गुरव, प्रतीक्षा पाटील, कल्पना सोनवणे आदींनी योगदान दिले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन सोपान पाटील आणि सुनिल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवक वर्गाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम सोनवणे व अनिल पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पुष्प शुभम पाटील यांनी गुंफले.