मार खाऊन पोलिसात जाण्यापेक्षा मारून पोलिसात जा – पँथर डॉ. राजन माकणीकर

  32

  ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  मुंबई(दि.27फेब्रुवारी):-जातीवादी बांडगुळाचा मार खाऊन पोलिसात जाण्यापेक्षा मारून पोलिसात जा, अश्या व्यक्तीला कायद्याचे संरक्षण देऊ, असा सल्ला वजा दिलासा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी अन्याय पीडितांना दिला.

  देशासह राज्यात जातीवादाच्या मानसिकतेतून असंख्य भ्याड हल्ले होत असून यात दलित मुस्लिम बौद्ध जाती जमातींना टार्गेट केलं जातं आहे, जाती जमातींच्या व्यक्तींना त्यांच्या वस्तीवर जाऊन तर घरात घुसून सामूहिक हल्ला केला जात आहे, ही बाब मानवतेला शोभणारी नाही.

  अशा प्रसंगी अन्याय सहन न करता प्रतिउत्तर देणे महत्वाचे ठरते, माझा या तमाम जाती जमातींना सल्ला असेल की अजिबात मार खाऊ नका. तोडून फोडून टाका जातिवादाला. कायद्याची लढाई डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या बाजूने लढेल.

  किती वर्षे पार्टी संघटना व संस्थेच्या माध्यमातून निषेध आंदोलने करायचे, आता बस्स..!
  सर्व ताकदीनिशी प्रतिउत्तर महत्वाचे होय. वस्तीत ही लोक घुसतातच कशी? मग वस्तीतील अन्य समाजबांधव का बघ्याची भूमिका घेतात?? हे सोडा आता।

  पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात एक नवा झंझावात म्हणून आर.पी.आय डेमोक्रॅटिक संचार करत आहे. सर्व जातीधर्मातील वंचित समूहाचा पक्ष म्हणून आरपीआय (डी) ला प्रचिती मिळत आहे.

  अट्रोसिटी च्या कुबड्यांचा वापर टाळा, मनगट मजबूत करा, आपण शिवरायांचे मावळे भीमरायांचे अनुयायी असे भ्याड जीवन न जगता प्रतिउत्तर द्या, रिपाई डेमोक्रॅटिक आपल्या पाठीशी संविधानिक व कायदेशीररीत्या उभी राहील याची नोंद घेण्याचा सल्लाही डॉ. माकणीकर यांनी दिला.