लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका समोरील अतिक्रमण हटवा अन्यथा आत्मदहनाचा इशारा.

26

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.4मार्च):-मनमाड शहर हद्दीतील इंदिरा गांधी शॉपिंग सेंटरचे आजू-बाजूचे व पुर्वे कडील राज्या मार्ग लगत असलेले अतिक्रमण नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग मनमाड व मनमाड शहर पोलीस विभाग यांच्या मार्फत संयुक्त मोहिम घेऊन काढण्यात येणार होते ते अतिक्रमण आतापर्यंत का काढण्यात आले नाही त्याचे लेखी स्वरुपात उत्तर मिळावे. नगर परिषदेचे आणि सामनेवाले अतिक्रमणधारकांचे काही देवाण घेवाण आहे का हे न. पा.ने स्पष्ट करावे. मी स्वत: या अगोदर आपल्या कार्यालयात या संदर्भात अनेक अर्ज केले आहे. तरी देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याचे स्पष्टीकरण न. पा.ने लेखी स्वरुपात मला द्यावे.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीर सेवाभावी संस्था यांनी दिनांक १/१२/२०२०रोजी धरणे आंदोलन केले होते आणि नगर परिषदे मार्फत या संस्थेला लेखी पत्र देण्यात आले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका समोरील अतिक्रमण ३१ डिसेंबर २०२०पर्यंत काढण्यात येणार आहे. असे नमूद केले गेले होते परंतु नगर परिषदे मार्फत माझ्या स्वतःची व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची व समस्त मनमाडकरांची दिशाभूल न.पा.मार्फत केली गेली आहे मनमाड नगरपरिषद ने ३१डिसेंबर २०२० पर्यंत अतिक्रमण काढणार होती. मग आता 2 महिने वर होऊन गेले तरी देखील नगरपरिषद अतिक्रमण कङे का कानाडोळा करत आहे हे मनमाडकर नागरीकांना काही कळेना. नवकीच काहीतरी देवाणघेवाण आहे का ? असे मनमाड कर शहरवासीय यांना वाटते.

मनमाड नगर परिषदेतर्फे दि.४/११/२०२०रोजी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढणे बायत नोटीसा देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर संस्थे मार्फत दिनांक २७/११/२०२०रोजी अर्ज केला होता. संस्थेमार्फत धरणे आंदोलन केले व न. पा.ने लेखी आश्वासन दिले दि. ३१/१२/ २०२० रोजी अतिक्रमण काढण्यात येईल आमची दिशाभूल केली जनता माफ करणार नाही

आता जर नगर परिषदे मार्फत जर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकासमोरील अतिक्रमण आठ ते दहा दिवसाच्या आत काढले नाही तर मी स्वत: रविंद्र चंद्रकांत निकम (सामाजिक तथा आर.टी.आय.कार्यकर्ता) न. पा.च्या ऑफिस मध्ये स्वतःच्या अंगावर रॉकेल, पेट्रोल, डिझेल ओतून स्वतःचे आयुष्य संपविल. यात माझा जीव गेला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही न.पा.बांधकाम विभाग व मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांची राहिल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असा इशारा रवींद्र निकम यांनी दिला आहे.