रोशन राजूरकरच्या बीई शिक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली आर्थिक मदत

35

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.4मार्च):-आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि ते आत्मनिर्भर बनावे यासाठी सातत्याने सहकार्याची भूमिका करीत आहे. चिमूर तालुक्यातील गोठणगाव रोशन राजूरकर या विद्यार्थ्यांच्या बीई शिक्षणासाठी २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

गोठणगाव येथील रोशन राजूरकर यांची रायशोनी कॉलेज नागपूर येथे कॉम्प्युटर सायन्स अँड ईनजीनीरिंग विषयात शिक्षण घेत असून शिक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.यावेळी मदत देत असताना भाजपचे तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार, रमेश कंचर्लावार सुरेश ठाकरे आदी उपस्थित होते.