स्त्री आंदोलन: एक क्रांतीपथ

  35

  समाजव्यवस्थेतील अर्धा भाग असलेला स्त्री समाज आज नव्या क्षितीजावर तेजाने यशोशिखरं पादाक्रांत करत आहे.नव्या ज्ञानाच्या कार्यात महिलाचे योगदान अमूल्य असे आहे.पण आज जी स्त्री प्रगती दिसून येते ती प्रगती करण्यासाठी असंख्य दुःख ,कष्ट व संघर्ष करावा लागला.

  आज स्त्रीशक्तीला जे गतिमानत्व आले आहे.यात स्त्री चळवळ व स्त्री आंदोलन यांचे फार मोठे योगदान आहे.१९०८ मध्ये नूर्यांक येथे कामगार महिलांनी कामाचे तास कमी व्हावे यासाठी आंदोलन केले.तेव्हापासूनच जागतिक पातळीवर स्त्री आंदोलनाला पाठींबा मिळू लागला.क्लारा जेटकिन यांनी १९१० ला कोपेनहेगन येथे १७ देशातील १०० महिला एकत्रीत येऊन महिला दिनाचे महत्व समजावून दिले.स्त्रीमधील क्रांतीजाणिवाला पूढे आणले.१९११ ला ऑस्टिया,डेन्मार्क ,जर्मनी व स्वित्झलँण्ड येथे महिला दिन साजरा केला गेला.

  महिलांच्या उत्थांनासाठी अनेक समाजसुधारकांनी आपले आयुष्य खर्ची केले.स्त्री दास्य व कुप्रथा विरूध्द आवाज बुलंद केला.धार्मिक गुलामगिरीत अडकलेल्या स्त्री वर्गाला नव्या स्वातंत्र्याचे पंख दिले.हे काम करतांना प्रस्थापित सनातनी समाजव्यवस्थेने मोठा त्रास दिला.जागतिक पातळीवर स्त्री आंदोलनाच्या प्रभावामुळे अनेक देशात समान अधिकार देण्यात आले.मतदानाचा अधिकार देण्यासाठी स्त्रीयांना आंदोलन करावे लागले.भारतात मात्र संविधानात समान अधिकार दिल्याने मतदानाचा अधिकार मिळाला.संविधानाच्या क्रांतीऊर्जेने भारतीय स्त्रीला नवा आत्मविश्वास मिळाली.प्रगतीचे नवे आत्मभान जागृत केले.संयुक्त राष्ट्रसंघाने स्त्री वर्गाच्या प्रगतीसाठी १९७५ मध्ये “आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले.तेव्हाची थीम ” सेलिब्रेटिंग द पास्ट प्लॉनिंग फॉर द फ्युचर “ही होती.

  भारतीय समाजव्यवस्थेत स्त्री वर्गाला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागलेल्या आहेत.स्त्रीला मानवीय अधिकारापासून वंचित ठेण्यात आले.ब्राम्हणी ग्रंथात काही स्त्रीच्या व्यक्तीरेखा चित्रित केल्या असल्या तरी त्यांनी फार क्रांती केली हे मानता येणार नाही.मनुस्मृती या ग्रंथाने स्त्रीला चुल आणि मूल या मर्यादेत अडकवून ठेवले .पुरूषांची सेवा करणे हा स्त्रीचा खरा धर्म आहे.असा विषारी दंडक घालून तिच्या प्रगतीचे पंख छाटून टाकले.मातृशक्ती व्यवस्था असलेल्या विचारसरणीला समाप्त करून पुरूष प्रधान व्यवस्था तयार केली.वैदिक काळातील अन्याय व अत्याचारी समाजव्यवस्थेवर प्रहार करून तथागत गौतम बुध्द् यांनी महिलांना आपल्या धम्मात समान अधिकार दिले.कोणताही भेदभाव न मानता सर्व मानवाला समान मानले.स्त्रीला मानवतेची शिकवण देणारा जगातील प्रथम महाक्रांतीकारक म्हणून तथागत गौतम बुध्द् यांना ओळखे जाते.बुध्द धम्माचा थेरीगाथा या ग्रंथात स्त्री कार्याचे महत्व विशद केले आहे.

  यात सुत्ता,पुव्वा,धम्मदिन्ना,महाप्रजपती गौतमी,विसाखा,आम्रपाली,पटाचारा,सुजाता अशा महान भिक्खुनिचा विचार प्रतिपादित केले आहेत.थेरीगाथा म्हणजे स्त्रीयांच्या स्वातंत्र्याचा ऐतिहासिक दस्ताएेवज आहे.
  मुस्लिम धर्मातही महिलांना विशेष अधिकार दिले आहे.पण कर्मठ लोकांच्या विचारामुळे आज मुस्लिम समाजातही महिलांना कठीण प्रसंगाला समोर जावे लागते.मध्ययुगातील मुस्लिम शासक रजिया सुलतान हीचे कार्य अत्यंत क्रांतीदर्शी असे आहे.पुरूषप्रधान समाजाला न घाबरता आपले राज्य केले.शौर्य व कौशल्य यातून तिने अनेक बंड मोडून काढले.स्त्री समाजाला नवी ऊर्जा दिली.

  प्रबोधन काळातील विज्ञानाच्या क्रांतीमुळे धर्म ग्रंथाची चिकित्सा होऊ लागली.नव्या लेखन प्रगतीने समाजमन ढवळून निघाले.स्त्रीयावरील होणाऱ्या अत्याचारावर चर्चा होऊ लागली.पोपची मक्तेदारी,मौलावीची एकलवृत्ती,भटपांड्याची अमानवीयवृत्ती यावर देशात व जगात विचारमंथन होऊ लागले.स्त्रीयांना शिक्षणाच्या वाटा बंद केल्यामूळे ती क्रांती करू शकली नाही.धर्माची बंधने झूगारू शकली नाही.जिजाबाई या अत्यंत क्रांतीकारी राष्ट्रमाता ठरल्या .त्यांनी स्वतःच्या दुरदृष्टीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याची उर्मी दिली.स्त्रीवर अन्याय करणाऱ्यांवर कोणताही मुलाजिहा न ठेवता कठोर शिक्षा द्यावी.अहिल्याबाई होळकर यांनी स्वतःच्या राज्यकारभारातून महिला किती खंबिर व कार्यतत्पर असते यांची ओळख करून दिली.

  अठराव्या शतकामध्ये महिलांना कठीण प्रसंगाला समोर जावे लागले.समाजातील अरिष्ट रूढीपरंपरा यांनी त्याचे जीवन उध्दवस्त केल होते.बालविवाह,सतिप्रथा,केशवपन,बालहत्या,विधवा विटंबना,अज्ञान,इत्यादी अमानवीय कौर्यभरी व्यवस्थेने स्त्रीचे जीवन अंधकारमय केले होते यासाठी राजा राममोहन रॉय,महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी समाजमान्य व्यवस्थेवर आसूड ओढले.१८४८ ला फुले दांपत्यानी मुलींची पहिली शाळा काढून स्त्री वर्गाला ज्ञानसू्र्याची तेजस्वीता दाखवली.आजच्या महिलात जे आमूलाग्र बदल घडून आलेले दिसतात त्याचे सर्व श्रेय महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या संघर्षामय जीवनाला जाते.
  ब्रिटीश राजसत्तेने भारतीय समाजाला नवा शिक्षणाचा मार्ग दाखविला.शुद्र समाज व स्त्री समाज यांना शिक्षणाचा अधिकार दिल्याने समाजात नवचैतन्य निर्माण झाले.स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्त्री वर्गाने मोठे योगदान दिले.

  समाजक्रांतीचा नवा परिघ बदलत असतांना मनुवादी मूलतत्ववादी बदल स्विकारत नव्हते.अस्पृश्य वर्गाला व स्त्री वर्गाला अधिकार देत नव्हते . आर्थिक,सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्राने त्याचे जीवन गुलाम केले होते.अशा कालखंडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री समाजाला नवीन महाऊर्जा दिली.देवदासी प्रथा,आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह बंधन,हुंडाप्रथा ,अज्ञान दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.कुटूंबनियोजन ही वैज्ञानिक संकल्पना देशाला दिली.ते महिलांना उद्देशुन म्हणतात की,”तुम्ही स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गूणांपासून मुक्त राहा.तुमच्या मुलांना शिक्षण द्या ! हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा.ते थोर पुरूष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा .त्याच्यातील हिनगंड नाहिसा करा.लग्न करण्याची घाई करू नका .लग्न म्हणजे जबाबदारी लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार पाडण्याइतपत आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांच्यावर लग्न लादू नका .जे लग्न करतील त्यांनी हे वाक्य ठेवले पाहिजे की,अती जास्त मुले होणे हे दृष्टकृत्य आहे.आपल्या लहानपणी आपणाला मिळू शकली त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती आपल्या प्रत्येक मुलाला देणे हे आईवडिलाचे कर्तव्य आहे.”ही गर्भजाणीव आजच्या मानवाने समजून घ्यावी. महाड चवदार तळे महाआंदोलनात,काळाराम मंदीर आंदोलन,महिला परिषद,धम्मचक्र प्रवर्तन या आंदोलनानी महिलेला नवी ऊर्जावर्धन केले.अस्पृश्य स्त्री किती ताकतवर आहे याची जाणीव त्यांना झाली.

  भारतीय संविधानाने भारतीय स्त्री वर्गाला नवी उभारी दिली आहे.कलम क्र.१४,१५,१६,२३,३९,४२,५१,२४३ यामध्ये स्त्रीला नवे ऊर्जाबल दिले आहे.या ऊर्जायानातून आजची भारतीय स्त्री राष्ट्रपती,राज्यपाल,प्रधानमंत्री,मुख्यमंत्री,प्राध्यापक,वकिल ,
  डॉक्टर,इंजिनिअर,शास्त्रज्ञ,लेखिका,शिक्षिका,सैनिक,वैमानिक या क्षेत्रात भरारी मारू शकली. हिंदू कोड बीलामधून महिला समाजाला समानतेचा अधिकार मिळाला .आपल्या वडिलोपार्जित वारसान हक्क मिळाले. स्त्री जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम हिंदू कोड बीलामधून घडून आले आहे . यासाठी भारतीय महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सातत्याने प्रेरणा घ्यावी व कृतज्ञता बाळगावी.

  आंबेडकरवादी साहित्यातील स्त्री लेखिकांनी समाजव्यवस्थेतील अन्यायकारी कृप्रथावर शब्दक्रियेने प्रहार केला आहे.कविता ,कथा,कादंबरी, नाटक, या रचना प्रकारातून पुरूषप्रधान व्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला.जाती व धर्माचे बंधन झूगारून आज ती खुल्या आकाशात विहार करते.

  आजच्या काळातील स्त्री आंदोलनाचे नेतृत्व करत आहे.एन,आर,सी,सी,ए,ए,आंदोलन,स्त्री अन्याय आंदोलन,शेतकरी आंदोलन,कामगार आंदोलन,विद्यार्थी आंदोलन, या आंदोलन नव्या भारताची उभारणी करत आहे.संविधानाच्या क्रांतीतेजाने ती प्रज्वलीत झाली आहे.राजकिय पक्ष तीचा आवाज दाबू शकत नाही.सरकारी यंत्रणा तीच्या कार्याला रोखू शकत नाही.कारण तीच्या पंखात संविधानसूर्याची महाऊर्जा धगधगत आहे.तीच्या हातात व मनात पेन , संविधान व बाबासाहेबांचा विचार आहे.

  स्त्री वर्ग आज उच्चशिक्षित झाला आहे.पण काही धर्मधिष्टित मेंदू असलेले उच्च वर्ग स्त्री ,बहुजन पोथीनिष्ट महिला,यांच्या डोक्यातून व्रतवैकल्प,देव,धर्म,पुजा,प्रार्थना, उपवास,या चक्रव्युहात फसली असल्याचे दिसून येते.ती पुरूषप्रधान व्यवस्थेच्या वर्चस्वाला झूगारू शकली नाही.आजही काही महिला बापू,पंडे,झासाराम,भोंदू बाबा,सतीमाय,मातामाय ,राधे मॉ,रामपाल,भोंदू संत,योगीभोगी,अशाच्या मोहजालात फसलेली आहे.स्त्री वर्गाला आपल्या विचारात अंकित करून ठेवण्याची कला त्यांना गवसल्याने ते आपले गैरफायदा घेतो हे माहित असूनही ती सजग होत नाही ही मोठी शोकांतिका आहे.बनावट बाबाच्या फसव्या कार्याला नेते मंडळी सहकार्य करतात हे भारतीय लोकशाहीला अत्यंत घातक आहे.आता महिलांनी अशा बनावट बाबाच्या मुळांना आग लावून स्त्रीला नवा आत्मविश्वास द्यावा.घरातील गाभाऱ्यात राहणाऱ्या भोंदूगीरीची पिलावळ समाप्त करावी.स्त्रीयांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी नेहमी लढण्यास सज्ज असावे.

  भारतीय स्त्रीयांनी भारतीय संविधानाला प्रमाणग्रंथ मानावा.धर्म वैयक्तिक बाब आहे पण तीचे अवडंबर करू नये .मुलांच्या भविष्यासाठी संविधानात्मक लोकशाहीचा जागर करावा.संविधानातील विज्ञाननिष्ट जाणीव व समानता यांची अणुऊर्जा घेऊन संविधानात्मक संस्कृती निर्माण करावी.महात्मा जोतीराव फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,डॉ.बाबसाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,फातिमा बिबी,यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावा.भोंदूगिरीचा बुजबुजाटाने बुध्दीला अंधमानापेक्षा संविधानातील कलमाने प्रकाशमान करा.स्त्री आंदोलनानी स्त्रीला नव्या क्रांतीजाणिवाचा मुल्यवर्धन आविष्कार दिला आहे.स्त्री आंदोलन म्हणजे नवनिर्मितीची पाठशाला आहे.या पाठशालेतून निघणारी तरूणी भारताच्या एकात्मतेचा नवी क्रांती ऊर्जा ठरावी. वर्तमान संक्रमणाच्या काळात भारतीय स्त्रीने आत्मनिर्रभर व्हावे.सरकारच्या दडपणाला न जुमानता आपला आवाज बुलंद करावा.देशातील व जगातील होत असलेली स्त्री आंदोलन हे जग बदलविणारे क्रांतीपथ आहेत असे वाटते.

  गुलामी की जंजींरो को तोडकर
  आकाश मे उडनें की तमन्ना है।
  सावित्री माँ की प्रेरणा से
  नई ज्ञान क्रांती करना है।
  आप के हर पाखंड को
  हमने आज जाना है।
  भारत के संविधान से
  अपनी मंजिल पाई है।
  देखना है जोर कितना
  आप के बगोडाग्रंथ मे है।
  हमने नई रोशनी से
  उसे खाक कर दिया है।

  ✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००