गोंदेडा येथे ‘आमचं गाव,आमचा विकास’ अंतर्गत कार्यशाळा

    44

    ✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)मो:-7038121829

    नेरी(दि.10मार्च):- चिमूर पंचायत समिती अंतर्गत मदनापूर गणस्तरीय ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा गोंदेडा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह गोंदेडा या ठिकाणी संपन्न झाली. १५ व्या वित्त आयोग अंतर्गत आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत आराखड्यात महिला व बालकल्याण,गावांच्या गरजेनुसार आवश्यक पायाभूत सुविधा अशा अनेक विषयांवर कार्यशाळा संपन्न झाली.या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रशिक्षक विस्तार अधिकारी व्ही.एस.ननावरे. यांनी मार्गदर्शन केले.

    या कार्यशाळेचे उदघाटन चंद्रपुर जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके ,पंचायत समिती सदस्य गीताताई कारमेघे,या कार्यशाळेस ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, पशुवैद्यकीय अधिकारी, ग्राम संधान गट, महिला स्वयंसहायता गट, दिनांक ८ मार्चला या जागतिक महिलादिन दिनी मदनापूर गणातील यावेळी नवनिर्वाचित महिला सरपंच बचत गटातील महिलांनी जागतिक दिनावर मार्गदर्शन करण्यात आले.

    दोन दिवसीय कार्यशाळेत अंगणवाडीसाठी-बालकांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक खेळणी पुरविणे, गणवेश पुरविणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शौचालय बांधकाम, कुपोषित बालकांना आहार पुरविणे, अंगणवाडी डिजिटल करणे, ई-लर्निंग उपक्र म अभ्यासक्र मानुसार खेळाचे साहित्य पुरविणे,युवकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण घेणे,सामूहिक शेती, करार शेती, कृषी अवजारे स्थापन करणे, शेतकरी प्रशिक्षण, विपणन, उत्पादन वृद्धी, शेतीविषयक सल्ला केंद्राची स्थापना करणे, दुग्धउत्पादन प्रोत्साहन देणे, कुक्कुटपालन, शेळीपालन अर्थसहाय्य करणे, सामूहिक शेततळे, बंधारा बांधणे, महिलांसाठी व्यवसाय कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करणे, स्मशानभूमी बांधणे या व्यतिरिक्त अशा अनेक प्रकारच्या योजनांची प्रशिक्षण व माहिती एक दिवसीय कार्यशाळेत देण्यात आली.