सोनिजवळा येते महिला समपदेशन केंद्राचे उद्घाटन

30

🔸कोरो संघटनेच्या माध्यमातून महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.13मार्च):- दि. 11/3/2021रोजी केज तालुक्यातील सोनीजवळा येथे महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले सदरील माहिती अशी की केज तालुक्यातील सोनिजवळा
येथे महिला जागतिक दिनानिमित्त समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले लॉक डाउनच्या काळात महिला व मुलांवर झालेला अन्याय,अत्याचार, हिंसा मोठ्या प्रमाणात झाल्या. 

ग्रामपंचायत म्हणून कोरो द्वारे चर्चेत आल्या त्यावेळी सरपंच मुकुद गायकवाड व त्यांचे सहकारी बाळासाहेब कोकाटे यांनी गावातील महिला व कोरो संघटनेच्या महिला कार्यकर्त्या यांच्या मदतीने महिला समुपदेशन केंद्र उभा करण्याचं प्रस्ताव ग्रामसभेत मांडला व त्याचे आज ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने उदघाटन करण्यात आले.

यावेळी कोरो संघटनेचे कार्यकर्ते रोहिणी खरात , अनिता खंडागळे, अविनाश, खरात, लक्ष्मण हजारे ,तसेच सरपंच मुंकुद गायकवाड, बाळासाहेब कोकाटे, सुनीता पंडित, अर्चना ससाणे, अनुराधा जाधव, जयश्री वसेकर, लता ससाणे, काशीबाई शेळके, करीम बी शेख, संभाजी वेरागे , बालासाहेब श्रीसागर, गावातील सर्व नागरिक व सदस्य उपस्थित होते.