हॉटेल, पान टपरी, छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी – अशोक हिंगे

    77

    ?वंचितची बीड जिल्हाधिकारी यांना मागणी

    ✒️नवनाथ पौळ(केज प्रतिनिधी)मो:-8080942185

    केज(दि.16मार्च):-दि. १५ बीड जिल्ह्यातील शहरातील हॉटेल व्यवसायिक पान टपरी छोटे छोटे उद्योग व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांना या जाचक अटीतुन बाहेर काढून त्यांना इतर व्यापाऱ्यांन प्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी अगोदरच गेल्या वर्षींच्या लॉकडॉऊन मुळे छोट्या व्यवसायिकांची व कामगारांची कंबरडे मोडले आहे त्यात आपण छोट्या व्यावसायिकांसाठी जाचक अटी टाकून त्यांच्या समस्यात आणखीन वाढ केली आहे.

    तरीही माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हॉटेल पान टपरी छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना सोशल डिस्टन्स चे नियम पाळून त्यांना इतर व्यापान्यांन प्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी आपल्या कार्यालयाकडून मिळावी तसेच लग्न समारंभासाठी नियम व अटी लाऊन मंगल कार्यालय फिक्शन हॉल हे सुरू करावेत जेणेकरुन यांच्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे हाल होणार नाहीत.

    त्यासाठी आपणास हे निवेदन सादर करण्यात येत आहे नसता वंचित बहुजन आघाडी बीड शहरामध्ये सर्व हॉटेल पान टपरी छोट्या व्यवसायिकांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल आसे निवेदन द्वारे कळवण्यात आले आहे. यामध्ये अशोक हिंगे, मराठवाडा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, डॉ नितिन सोनवणे,बबन वडमारे,संतोष जोगदंड, ज्ञानेश्वर कवठेकर, मिलिंद सरपते,गणेश शिंदे आदी उपस्थित होते.