टेंभुर्णी येथे शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन

54

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.19मार्च):-ऐन ऊन्हाळयात विज खंडीत करून शासनाने ऐक प्रकारे शेतकरयाना मारण्याचे धोरण अवलंबले आहे कोरोणामुळे पूरा देश संकटात आसताना महाराष्ट्र सरकारने विज खंडीत करून शेतकरयाच्या हातातील घास काढून घेण्याचे काम केले आहे ऊभी पिके जळून जात आहेत जनावराची पिण्याच्या पाण्याची पंचाईत झाली आहे आणी ऊर्जा खाते पठाणी वसुलीच करत आहे आणी विज खंडीत करून शेतकरयाना दरिद्रीत ढकलण्याचे काम करत आहे.

आणखी काही कारखान्यातील उसाची बिले मिळाली नाहीत आशा परिस्थीतीनुसार राजकारण्यानी जगाच्या पोशिदयाला वारयावर सोडण्याचे काम केले आहे म्हणून आज दि 19/3/21 रोजी ठिक सकाळी10 वाजता महावितरण टेंभुर्णी कार्यालयासमोर शेतकरयाना सोबत घेऊण तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे