पदवीधर शिक्षक आमदार मा.सुधीरजी तांबे यांनी चिंचखेड शाळेस संगणक दिला भेट

    36

     ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

    नाशिक(दि.19मार्च):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड या शाळेसाठी नाशिक विभागाचे पदवीधर शिक्षक संघटनेचे आमदार मा. डॉ.सुधीरजी तांबे यांनी आमदार निधीतून प्राथमिक शाळेसाठी HP कंपनीचा संगणक भेट दिला… सदर संगणक मिळवण्यासाठी खेडगाव गटाचे जि.प.सदस्य मा.भास्कर भगरे सर व डॉ.योगेश गोसावी नाशिक जिल्हा डॉक्टर सेल प्रमूख] यांच्या प्रयत्नामुळे शाळेसाठी संगणक प्राप्त झाला आहे. सदर संगणकाचा शाळार्पण सोहळा आज मा.भास्कर भगरे सर जि.प.सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाला.

    या प्रसंगी मा.भास्कर भगरे सर यांनी परिसरात नावलौकीक मिळवलेली शाळा म्हणून तालुक्यातील एकमेव जि.प.शाळा म्हणजे चिंचखेड चे नाव घेतले जाते म्हणूनच आम्ही शाळेची गरज ओळखून संगणक मिळवण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि तो दिलेला शब्द पाळून पूर्ण केला.शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जातेच परंतु त्यात पुन्हा वाढ करुन दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे आवर्जून सांगितले. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय चौधरी यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती व शाळेचा शैक्षणिक दर्जा कसा वाढला व त्यासाठी ग्रामपंचायत,गावातील शिक्षण प्रेमी नागरिक , विविध संघटना या सर्वांचे सहकार्य व तालुक्याचे दुरदृष्टी असलेले गटशिक्षणाधिकारी मा.कनोज साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कोष्टी मॅडम व केंद्र प्रमूख श्री.दादासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा गुणवत्तेचा आलेख कसा वाढला याविषयीची माहिती सांगितली या प्रसंगी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेश ही वाटप करण्यात आले.

    सदर कार्यक्रमासाठी पं.स.सदस्या सौ.संगिता ताई घिसाडे,गावातील प्रतिष्ठित नागरिक मा.विठ्ठल तात्या संधान ,ज्येष्ठ कवी सरपंच सौ.मिनाक्षी ताई गुबांडे, उपसरपंच श्री.रावसाहेब आबा पाटील, कादवा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक श्री.टी.के.संधान सर,ग्रामपंचायत सदस्य श्री.शिवानंद भाऊ संधान,श्री.रामनाथ भाऊ घिसाडे, शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय ढुमणे,उपाध्यक्ष श्री.चंद्रभान संधान, सदस्य श्री.अनिल भाऊ संधान,श्री.सदुभाऊ सोनवणे ,पदवीधर शिक्षक श्री.शंकर ठाकरे, मनोहर देसले, सुधाकर भामरे,विठ्ठल डंबाळे, दत्ता भाऊ राठोड, प्रकाश पाटील ,श्रीम.प्रतिभा गुरव उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्कर्ष कोंडावार यांनी केले व शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.