गडचिरोली जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.21मार्च):– मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली हे मा. नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र, यांची मुंबई येथे भेट घेऊन, गडचिरोली जिल्हयातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. यामध्ये नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकिमध्ये सर्व जिल्ह्यांतील काँग्रेस नेते, तालुका अध्यक्ष व प्रमुख काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळे जवळपास ५० टक्के काँग्रेस पक्षाला तर, महाविकास आघाडीला ८० ते ८५ टक्के यश मिळालेला आहे.

यापूर्वी सुद्धा गडचिरोली जिल्हा परीषद मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे असून, काही पंचायत समिती, काही नगर पंचायत मध्ये सत्ता आहे. पुढील येणाऱ्या नगर पंचायत, जिल्हा परीषद व पंचायत समिती मध्ये यश संपादन करण्यासाठी पक्ष बळकट करणे, पक्ष संघटन करणे सुरु आहे. त्यात आपला सहकार्य व मार्गदर्शन असावे अशी मागणी डॉ नामदेवराव उसेंडी यांनी केले.

प्रामुख्याने पुढील निवडणुका मध्ये काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करावे. येणाऱ्या निवडणुकासाठी अधिक चांगले यश संपादन करण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष बळकट करावे. अश्या सूचना मा. नाना भाऊ पटोले यांनी केले.
यावेळी नानाभाऊ पटोले साहेब यांनी मिळालेल्या यशाबद्दल जिल्हाध्यक्षसह सर्व जिल्ह्यांतील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.