उमरखेड़ तालुक्यात अवैध वर्ली मटका, जुगार अड्डे, देशी दारू,प्रतिबधित गुटखा सह अवैध प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु

36

🔺ठाणेदार यांचा आशिर्वाद कोणाच्या इशाऱ्यावर ?

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

उमरखेड़(दि.22मार्च):- तालुक्यातील कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी दोन दोन लाख रूपयाचा प्रतिबंधित गुटखा रेड करून पकड़त आस्ताना फोफाळी कारखाना मुळावा परिसरातील प्रतिबंधित गुटखा कोठेही सहज उपलब्ध असुन,त्यांच्यावर कसले वंचक व नियंत्रण नसून पोलिसाची जरा पण भीति मुळीच बाळगली जात नाही,गुटखा तस्कर मोठ्या प्रमाणात होत असुन वंसतनगर कारखाना पोलिस स्टेशन अंतर्गत सक्रीय असून काळी कमाई करीत असल्याचा सर्व सामाण्य जनतेत चर्चा ,मुळावा परिसरात अवैध वरळी मटका जोमाने मोठ्या प्रमानात सुरु आहे.

विशेष व्यक्ति जवळ मटका लाऊँन त्याचा रिझल्ट ऑन लाईन बघितला जातो,वरळी, मटका,व जुगार या बाबत माहिती असून ही कोणतीही कार्यवाही केल्या जात नाही,देशी, अवैध दारू, मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात आहे,अवैध प्रवाशी वाहतुकीने तर उछाद मांडला आहे,नो शोशेल डिस्टन नो मास्क बस पैसे येऊ द्या,,?असा गोरख धंदा सुरु केला आहे,सदर आजु बाजुच्या परिसरावर उपविभागीय अधिकारी उमरखेड़ यांनी लक्ष्य देउन कार्यवाही करावी अन्यथा आम्हाला अंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनि आमच्या प्रतिनिधी समोर दिली आहे,