रब्बी हंगामातील ज्वारी कापणीला मजुर सापडेनात,शेतकरी झाला हवालदील

41

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७.

हणेगाव(दि.२२मार्च):- हणेगाव विभागातील रब्बी पिकाच्या कापणीला सुरुवात झाली असून,यामध्ये हरभरा,गहू,ज्वारी,भुईमुगाच्या शेंगा,करडी या पिकांचा समावेश आहे. पावसाळा यंदा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तूर सोयाबीन मूग उडीद ज्वारी यांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,तरी शेतकरी राजाने मात्र हिंमत हारला नाही. खरीप पिकाचे जरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी पुढील पिकाची आशा आपल्या मनाशी बाळगून शेतकरी पुन्हा हिमतीने कामाला लागला व रब्बीच्या पेरणीला सुरुवात करून अनेक जणांनी हरभरा, उन्हाळी ज्वारी, गहू,भुईमूग शेंगा,करडी या पिकाची पेरणी केली व दोन ते तीन महिने त्याची जोपासना केली.

आज कुठेतरी रब्बी हे पीक हाताला येईल का असे वाटत असतानाच हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता की पुन्हा गडगडाटासह पाणी पडण्याची शक्यता वर्तविली होती.यामुळे पुन्हा शेतकरी हवालदिल झाला या अगोदरच कोरोना महामारी च्या गर्दी मध्ये सापडलेला सामान्य वर्गातील शेतकरी हा कसे जगावे काय करावे या विवंचनेत असतानाच पुन्हा या महामारीने सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे रब्बी पिकाशिवाय कोणतीच हिंमत उरली नसल्यामुळे शेतकरी या पिकाकडे आस लावून बसला असून आज घडीला तरी शेतकऱ्याला हे धान्य घरी येईपर्यंत हे पीक आपले नाही असेच म्हणावे लागेल तरी शेतकरी आपल्या या सर्व पिकाची पेरणी करून जमेल त्या पद्धतीने पीक हाताला कसे लागेल याच चिंतेत काम करताना दिसत आहे.