राज्यात कायदा सुव्यवस्था साबूत आहे का?- पॅथर सेनेचे सागर साबळे

42

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.23मार्च):- एका पाठीमागे एक हत्याकांड बलात्कार, अत्याचार, हल्ले, सारखे प्रकार सध्या राज्यात सुरू आहेत, हे चित्र बघून राज्यात कायदा सुव्यवस्था साबूत आहे का? असा प्रश्न पॅथर सेनेचे सागर साबळे यांनी केला आहे.
एकीकडे पोलीस खात्यातल्या एका अधिकाऱ्या मार्फत राज्याचे गृहमंत्रीच जर वसुली करायला लावत असतील तर सामान्य माणसाचे काहीच खर नाही,कारण हप्ते वसूल करणे म्हणजे गुन्हेगारीला पाठबळ देणं होय. बियर बार, रेस्टॉरंट, हॉटेल,नाईट लाईफ च्या नावाखाली हे धंदे रात्रभर सुरु ठेवायचे आणि पोलिसांनी लाखो, करोडो रुपये हप्ते घ्यायचे हा निव्वळ धंदा मंत्र्यांनी सुरू केलेला आहे.

कोरोना महामारी मुळे एकीकडे सामान्य माणूस गरीबात गरीब होत चाललेला आहे.तळहातावर पोट असलेल्या माणसाच्या हाताला अजूनही कायम स्वरूपी काम नाही आणि हे हप्ते वसूल करण्यात मग्न आहेत..आमची राज्याचे मुख्यमंत्री आ.उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती वजा मागणी आहे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावीव राज्यात कायदा सुव्यवस्था साबूत आहे हे दाखवावे असे मत पॅथर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सागर साबळे यांनी व्यक्त केले.