उपळवटे येथे आमदार संजय मामा शिंदे यांचा सत्कार

24

🔸धडाडीचे सरपंच बालाजी ( काका) गरड-पाटील यांच्या येथे कार्यक्रमाचे आयोजन

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

माढा(दि.23मार्च):- तालुक्यातील उपळवटे येथे उपळवटे गावचे नुतन सरपंच बालाजी (काका) गरड पाटिल यांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजय मामा शिंदे हे उपस्थित होते.

नुकतेच उपळवटे ग्रामपंचायत सरपंच पदी निवड झालेले बालाजी काका गरड पाटिल यांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर बाजीराव गरड पाटिल व उपळवटे गावातील सर्व ग्रामस्थांनकडुन करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित  यावेळी नुतन सरपंच बालाजी गरड-पाटील यांनी गावातील विविध समस्यांबाबत संजय मामांना माहिती दिली. यावर मामांनी सरपंच बालाजी गरड-पाटील यांना लागेल ते सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. *संजय मामा म्हणाले की बर्याच वर्षांनंतर उपळवटे गावाला एक धडाडीचा सरपंच मिळाला आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य मा.उद्धव दादा माळी सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे ,भरत खुपसे , श्रीमंत खुपसे,अर्जुन गरड- पाटील लक्ष्मण खुपसे, शहाजी (आबा) गरड- पाटील, हिरामण जाधव व सर्व उपळवटे ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मंडळी उपस्थित होते