चंद्रपूर जिल्ह्यात (दि.25मार्च) रोजी 24 तासात 66 कोरोनामुक्त 245 कोरोना पॉझिटिव्ह – दोन कोरोना बधितांचा मृत्यू

46

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.25मार्च):- जिल्ह्यात मागील 24 तासात 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 245 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 489 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 417 झाली आहे. सध्या 1657 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 63 हजार 94 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 30 हजार 412 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील जयराज नगर येथील 83 वर्षीय पुरूष व वाल्मिक नगर येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 415 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 376, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 245 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 74, चंद्रपूर तालुका 23, बल्लारपूर 12, भद्रावती 18, ब्रम्हपुरी दोन, नागभिड पाच, सिंदेवाही पाच, मूल सहा, सावली सहा, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी तीन, राजूरा सात, चिमूर 13, वरोरा 46, कोरपना 19, जिवती एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺आज 56 नवीन कोरोना बाधित तर 24 कोरोनामुक्त

*गडचिरोली(दि.25मार्च):- आज जिल्हयात 56 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 24 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10328 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9828 वर पोहचली. तसेच सद्या 391 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.16 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.79 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.

नवीन 56 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 26, अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी 4, कोरची तालुक्यातील 1, सिरोंचा 1, तर वडसा तालुक्यातील 7 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 24 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 12, अहेरी 7, मुलचेरा 1, कुरखेडा 2, तर वडसा मधील 2 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये रामपुरी वार्ड 3 , जीएनएम वस्तीगृह 1, डोंगरमेंढा 1, पद्मालय नगर 1, कॅम्प एरिया 1, हनुमान वार्ड 1, त्रिमुती चौक 2, इंदाळा 1, गणेश नगर 1, पटवारी भवन जवळ 1, मोरेश्र्वर पेट्रोल पंप जवळ 1, जेप्रा 1, बोरगांव 1, वंजारी मोहल्ला 1, स्थानिक 2, रेड्डी गोडावुन चौक 1, चुराचुरा 1, लिटील फ्लॉवर शाळा 3, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, आलापल्ली 2 , नागेपल्ली 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, बरडी 1, बारकबोडी 1, नंदनवन कॉलनी 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये जांबली 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान नगर 1, सोनापूर 2, मार्केडा 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये मुलदीमा 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, एलबीपी हेमलकसा 4, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड 1, एसआरपीएफ कॅम्प विसोरा 5, हनुमान वार्ड 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 2 जणांचा समावेश आहे.