✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.3एप्रिल):-महाराष्ट्रातील एक राजबीड व्यक्तिमत्त्व, तरुणाला लाजवेल असं चेहऱ्यावर तेज व उत्साह, मुस्दी राज्यकर्ता असणारे नेते आदरणीय गंगाधरराव देशमुख कुंटूरकर हे पडद्याआड गेले ही बातमी सोशल मीडियावर वाचली अन मनात दुःख झाले..!!

कुटूंर गावातुन सरपंच पदा पासुन ते ,जिल्हा परिषद सदस्य ,जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ,कुंटूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार बँकचे संचालक आणि बिलोली विधानसभेचे आमदार, नांदेड लोकसभेचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इत्यादीसह अनेक असे महत्त्वाचे पद भूषवलेले आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर साहेब यांचे निधन झाले ,यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय पोकळी न भरुन निघणारी आहे. कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता हरपला म्हणाव लागेल.
नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED