विकास हरणे यांचे निधन

20

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.7एप्रिल):-येथील मूळ निवासी व सावली येथील समाजसेवी तथा हरणे राईस मिल चे संचालक विकास श्रीहरी हरणे यांचे बुधवारला त्यांचे सावली येथील राहते घरी सकाळी ११:२० वाजताचे सुमारास उपचारादरम्यान हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५३ वर्षाचे होते.

बुधवारलाच सायंकाळी ५:३० वाजता त्यांचे पार्थिवावर सावली येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.