सायकल स्टोर्स या दुकानाला आग लागून अंदाजे ५ लाखाचे नुकसान

21

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.12एप्रिल):-शहरातील कारंजा चौक येथील सुरेश चंपत ठाकरे यांचे मालकीचे ठाकरे सायकल स्टोर्स या दुकानाला आग लागून अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाले.आज रविवार सकाळी या दुकानातुन धुवा निघत असल्याने तेथे उपस्थित नागरिकांना दिसले.उपस्थित नागरीकांनी दुकान मालकास घटनेची माहिती दिली.याचवेळी अग्निशमन विभागाससुद्धा माहिती देण्यात आली.

यावेळी सदर आगीत दुकानातील टायर ट्यूब्सचे ३ बोरे,छोट्या सायकल ५० नग, १८० टायर नग,स्पेयरपार्ट्स,२५ हजाराची कंप्रेसर मशीन इत्यादि जळून ५ लाख रूपयाचे नुकसान झाले. माहिती मिलताच दुकानमालक घटनास्थळी पोचले,
परंतु तोपर्यंत सर्व राख झाले होते.अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोचत आग पूर्णतः विझविली. संचारबंदीमुळे श्री ठाकरे यांचे दुकान बंद असतांना सदर घटना घडली असून शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.