नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका येवला जवळ एक कोटीचा अवैध दारू जप्त

28

🔺एक ट्रक सह दोन आरोपींना अटक

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

येवला(दि.26एप्रिल):-येथे शनिवार दिनांक 24 एप्रिल रोजी नाशिकचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने येवला पथकाच्या मदतीने येवला कोपरगाव राज्यमार्गावरील टोल नाका परिसरात जबाबदारीने सापळा रचून मुद्देमालासह एक ट्रक ताब्यात घेतला असून दोन आरोपींना अटक केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिळालेल्या गुप्त खबरी नुसार केलेल्या कारवाईत अवैद्य वाहतूक होत असलेला सुमारे एक कोटी रुपयांचा मद्यसाठा येवला नगर राज्यमार्गावरील पिंपळगाव टोल नाका जवळ जप्त करण्यात आला गेल्या काही महिन्यांपासून उत्पादन शुल्क विभागाने या ठिकाणी कारवाई करून असाच मोठा मुद्दे साठा जप्त केला होता.

उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईने नैवद्य मद्य वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील पिंपळगाव टोल नाका येथून क्रमांक युपी 82 टी 90 77 या मालवाहतूक वाहनातून शौचालय बांधण्यासाठी लागणाऱ्या सिरामिक भांड्याच्या बाजूस आडोशाला ठेवलेल्या गवतामध्ये गोवा राज्यातील विक्रीची परवानगी असलेला विदेशी मद्य साठा व इतर राज्यात विक्रीसाठी उत्पादन शुल्क केला जात होता उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक मनोहर अनचुळे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक पथक तयार केले होते.

या पथकात उत्पादन शुल्क निरीक्षक आर एम जळके सहाय्यक निरीक्षक भरारी पथक एच एस रावते सहाय्यक निरीक्षक ए पी पाटील व्ही ये चौरे येवला निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचून भगवांदास धनसिंग कुशवाह 41 विनोद फुलसिंग कुशवाह 36 दोघे राहणार राजस्थान या दोघांना ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे