हरणाच्या गंभीर जखमी पिलास वाचवण्यासाठी युवकांची धडपड

30

🔸सखाराम बोबडे ,शिवराज गुट्टे यांचा पुढाकार

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

पालम(दि.28एप्रिल):-रोड वरील मंगल कार्यालय जवळ दुपारी 2 वाजता जखमी अवस्थेत पडलेल्या हरणाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी युवकांनी धडपड केली. घटनास्थळी प्राथमिक उपचार करून त्याला बुधवारी परभणीला हलविण्यात आले.

पालम रोड वर हरणाचे पिल्लू जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती शेजारील वीटभट्टी चालत घोलप यांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवली. बोबडे यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ अली यांना सदर माहिती कळवत घटनास्थळी जाऊन उपचार करावेत अशी विनंती केली .

यावरून अली यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवून घटनास्थळी येऊन उपचार केले. तहसिलदार स्वरूप कंकाळ, यांचेसह वन विभागाच्या अधिकारी भेंडेकर मॅडम यांनाही याबद्दलची माहिती कळविण्यात आली होती.सखाराम बोबडे पडेगावकर, भाजपा युवा मोर्चाचे शिवराज गुट्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर उनात घटनास्थळी दोन तास वेळ देऊन या हरणस वाचण्यासाठी प्रयत्न केले. प्राथमिक उपचारानंतर त्या हरणास पुढील उपचारासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परभणीला हलवले.