सर्व पत्रकार कोविड योद्धा असुन त्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी – दिनेश लोंढे सातारा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ

    53

    ✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    सातारा(दि.1मे):-सर्वत्र मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच भागात लसीकरण चालू आहे मात्र नागरिकांची लोकसंख्या आणि येणाऱ्या लसीची संख्या ही त्यामानाने कमी आहे. लोकांना विनाकारण पहाटे ६ वाजलेपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच लसीकरण केंद्रात ही मोठया प्रमाणात सावळा गोंधळ चालू आहे.

    या काळात पत्रकार बांधव आपल्या जिवांची कसलीही पर्वा न करता. तो सकाळी घराबाहेर पडून सामाजिक,राजकीय, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातील सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वत्र फिरत असतो. त्यामुळे सर्व पत्रकारांना लसीकरनाची अत्यंत गरज आहे तेव्हा प्रथम प्राधान्य देऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वाना कोविड लस लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी सरकारला महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्ह्याच्या वतीने केली आहे.