चांदवड येथील रूग्णालयात एम डी मेडिसिन डॉक्टर हवेत-सुनील अण्णा सोनवणे यांचे निवेदनद्वारे मागणी

25

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.1मे):-चादंवङ येथे शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एम डी मेडिसिन डॉक्टर नाहीत.सध्याची कोविड परिस्थिती लक्षात घेता अनेकांना हृदयरोग,शुगर ,उच्च रक्तदाब असल्याने एम डी मेडिसिन डॉक्टरांची आवश्यकता भासत आहे, चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉ दळवी हे एम डी मेडिसिन झालेले असून ते प्रतिनियुक्तीवर नाशिक जिल्हा रुग्णालयात आहेत.

तरी डॉ दळवी यांची चांदवड उपजिल्हा रुग्णालयात चांदवड करांच्या आरोग्याची काळजी घेणेसाठी पुनर्नियुक्ती करावी अशी आमची मागणी असल्याचे निवेदन सुनील अण्णा सोनवणे यांनी तहसीलदार व आमदार व इतर अधिकारी यांना दिले आहेत