चंद्रपूर व अहेरी शहरात दिले प्रत्येकी ३ ऑक्सिजन मिनी व्हेटींलेटर

22

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3मे):- शहरात वाढती कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजासाठी धावून आला आहे.

चंद्रपूर व अहेरी येथील कोरोनाची भयानक स्थिती पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूरच्या माध्यमातून सेवा भावनेतून चालणाऱ्या संस्था व रुग्णालयाला प्रत्येकी ३ ऑक्सिजन व्हेटींलेटर देण्यात आले. या कार्यक्रमात चंद्रपूर येथे मा.नगर संघचालक रवींद्रजी भागवत यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती चे अध्यक्ष वसंतराव थोटे, सचिव आशिष धर्मपुरीवार यांच्या उपस्थितीत डॉ.बेंडले यांना सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा कार्यवाह शैलेश पर्वते, नगर कार्यवाह विनय आत्राम, हे प्रामुख्याने उपस्थित होते.

त्या सोबतच अहेरी येथे ऑक्सिजन ची कमतरता भासू नये या उद्देशाने डॉ. अमोल किशोरराव पेशट्टीवार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी तर्फे ३ ऑक्सिजन व्हेटींलेटर जिल्हा संघ चालक गजानन जी राहुलवार यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी नगर कार्यवाह अभय भोयर, सहकार्यवाह क्षितीज कविराजवार , तथा गणेश बोडावार हे उपस्थित होते.