चंद्रपूर जिल्ह्यात (दि.5 मे) रोजी 24 तासात 1462 कोरोनामुक्त, 1393 कोरोना पॉझिटिव्ह तर 23 कोरोना बधितांचा मृत्यू

    34

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.5मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 1462 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1393 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 66 हजार 431 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 48 हजार 679 झाली आहे. सध्या 16 हजार 731 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 96 हजार 966 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 25 हजार 332 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

    आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील हनुमान नगर तुकुम परिसरातील 70 वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील 40 वर्षीय पुरुष, रामनगर परिसरातील 66 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 46, 58 व 62वर्षीय पुरुष, 55 व 72 वर्षीय महिला, मारेगाव येथील 45 वर्षीय महिला, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 84 वर्षीय पुरुष, व्याहाड येथील 74 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 53 व 81 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील खैरी येथील 55 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील 42 व 56 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला,
    वणी- यवतमाळ येथील 12 वर्षीय मुलीचा समावेश आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत 1021 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 944, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 30, यवतमाळ 31, भंडारा 10 , गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

    आज बाधीत आलेल्या 1393 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 415, चंद्रपूर तालुका 69, बल्लारपूर 134, भद्रावती 106, ब्रम्हपुरी 60, नागभिड 41, सिंदेवाही 56 , मूल 91, सावली 41, पोंभूर्णा 07, गोंडपिपरी 34, राजूरा 25, चिमूर 62, वरोरा 168, कोरपना 61, जिवती 13 व इतर ठिकाणच्या 10 रुग्णांचा समावेश आहे.

    नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

    ?गडचिरोली जिल्ह्यात 251 कोरोनामुक्त, 18 मृत्यूसह (दि.5मे) रोजी 586 नवीन कोरोना बाधित

    गडचिरोली(दि.5मे):-आज जिल्हयात 586 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 251 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 23598 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 18535 वर पोहचली. तसेच सद्या 4580 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 483जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

    आज 18 नवीन मृत्यूमध्ये 61 वर्षीय पुरुष आरमोरी, 55 वर्षीय महिला कुनघाडा ता.चामोर्शी , 70 वर्षीय पुरुष पारडी गडचिरोली , 66 वर्षीय पुरुष बेडगाव ता.कोरची, 57 वर्षीय महिला मीचगाव ता.धानोरा , 44 वर्षीय पुरुष बोधलबंद ता.कोरची, 53 वर्षीय पुरुष चामोर्शी, 42 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 56 वर्षीय महिला डोंगरतामशी ता.आरमोरी, 58 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 52 वर्षीय पुरुष शिरपूर ता.कुरखेडा, 67 वर्षीय पुरुष आरमोरी, 78 वर्षीय महिला वडसा, 65 वर्षीय पुरुष खुदीरामपल्ली ता.मुलचेरा, 67 वर्षीय महिला ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 59 वर्षीय पुरुष आरमोरी, 53 वर्षीय पुरुष गिलगाव ता.चामोर्शी, 45 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.54 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.41 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला.

    नवीन 586 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 211, अहेरी तालुक्यातील 67, आरमोरी 32, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 37, धानोरा तालुक्यातील 19, एटापल्ली तालुक्यातील 44, कोरची तालुक्यातील 17, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 28, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 22, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 32 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 71 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 251 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 160, अहेरी 109, आरमोरी 23, भामरागड 8, चामोर्शी 14, धानोरा 07, एटापल्ली 1, मुलचेरा 3, सिरोंचा 11, कोरची 0, कुरखेडा 11, तसेच वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.