आमदार समीर कुणावार यांच्या निधीतून जीवनोपयोगी औषधींचा साठा उपलब्ध

21

✒️इकबाल पैलवान(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-९९२३४५१८४१

सिंदी (रेल्वे)(दि.14मे):-शहर आणि परिसरातील कोविड रुग्णांची वाढती संख्या बघून कोविड रुग्णांसाठी आवश्यक असलेला औषधी साठ्याची त्या ठिकाणी कमी होत असल्यामुळे तिथे औषधी ची आवश्यकता होती. त्या साठी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन निधी मंजूर करून त्याठिकाणी आमदार निधीतून औषधी साठा देण्यात आला. सोबतच दोन Oxygen Concentrator सुद्धा देण्यात आले.कोविड रुग्णांना या ठिकाणी औषधी उपचारासाठी सुविधा निर्माण झाली असून डॉ. शिवरकर हे या ठिकाणी निशुल्क सेवा देत आहे यांचे आमदार समीर कुणावार यांनी अभिनंदन केले.

त्यांना सांगितले की पेशंटची ट्रीटमेंट चांगली करा जास्तीत जास्त लोकांना वाचवा प्रत्येक जीव हा मोलाचा असून जीवावर योग्य उपचार होणे फार आवश्यक आहे.न. प. अध्यक्षा व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांच्याकडे सदर औषधी साठा व साहित्य सुपूर्त केले. तेथील पेशंटला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळावी म्हणून दोन लक्ष रुपयाची औषधी आणि दीड लक्ष रुपयाचे 02 Oxygen Concentrator त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदी रेल्वे यांना उपलब्ध करून दिले.गावातील सर्व कोरोना ग्रस्त पेशंटनी या औषधी चा चांगला उपयोग घ्यावा असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले.

त्याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता कुंभारे, श्री. संजय डगवार व इतरांकडून आरोग्य केंद्राच्या कामकाजाची माहिती घेतली. आमदार निधीमधून देण्यात आलेल्या औषधी, उपकरणे व साहित्याचा योग्य वापर करून कोरोणावर मात करण्याचे अविरत प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले. उपस्थित नगरसेवकांना यावेळी आरोग्य विभागाला यथोचित सहकार्य करण्याची विनंती केली.

…..त्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी डॉ. शिवरकर द्वारा संचालित कोव्हीड सेंटरला भेट दिली. तसेच गुंज कॉन्व्हेंटमधील कोविड केअर सेंटरला भेट दिली असून त्या ठिकाणची व्यवस्था पाहिली तसेच कोविड केअर सेंटर मध्ये असलेल्या पेशंटची दुरूनच चर्चा करून माहिती घेतली. त्यांना मिळणा-या व्यवस्थेबद्दल माहिती करून घेतली तसेच त्या ठिकाणी सेवा देणाऱ्या लोकांशी चर्चा केली पेशंटला कुठल्या गोष्टीची कमी असेल त्याबद्दल विचारणा केली येथील चांगल्या प्रकारची व्यवस्था पाहून तेथील चांगल्या कार्याबद्धल *आमदार समीर कुणावार* यांनी तेथील कार्य करणाऱ्या लोकांचे मनस्वी अभिनंदन केले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत *नगराध्यक्षा सौ.बबिता तुमाणे, ओम राठी, अकील शेख, देवतळे, अनिल साखळे, गिरीधर कारमोरे, अनिल चांदेकर, यशवंत बडवाईक, प्रभाकर तूमाने, रोशन तडस, बालु सोनटक्के, रमेश वडांद्रे, अजय निखार, महादेव बोरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.*