शहरात एक व तालुक्यातील पाच केंद्रावर कोव्हॕक्सिन लसच्या दुसऱ्या डोस साठी 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी लस उपलब्ध – पं. स. सभापती बालाजी (पिंटू) मुंडे

40

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.14मे):-शुक्रवार दि. 14 मे रोजी शहरातील एक तर तालुक्यातील 5 केंद्रावर येथील कोविड-19 लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी कोव्हॕक्सिन लसच्या दुसऱ्या डोस साठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत लसीकरण सुरू राहील, पात्र नागरिकांनी केंद्रावर गर्दी न करता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे यांनी केले आहे.

केंद्र सरकारकडून राज्याला होणारा लसींचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे लसीकरण प्रक्रियेत बाधा येत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या लसींमधून ज्या नागरिकांना पहिला डोस देऊन विहित वेळ पूर्ण झाली आहे, त्यांना दुसरा डोस वेळेत देणे आवश्यक आहे. त्यामुळे परळीतील नटराज रंगमंदिर व प्रा आ केंद्र मोहा, प्रा आ केंद्र पोहनेर , प्रा आ केंद्र सिरसाळा प्रा आ केंद्र धर्मापुरी, प्रा आ केंद्र नागापूर येथील लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील दुसऱ्या डोस साठी पात्र असलेल्या नागरिकांनी कोवक्सिन लस चा डोस शुक्रवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत लसीकरण करून घ्यावे. तसेच यावेळी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन बालाजी पिंटू मुंडे यांनी केले आहे.