उल्हास बापू मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सेनिटायझर,फेसशिल्ड मास्क आणि निर्जंतुकीकरण

    36

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

    म्हसवड(दि.17मे):-राज्याबरोबर माण तालुक्यात गेले अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूंची अक्षरशा थैमान घातले असून कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही याचा विचार करून उल्हास वाघमोडे यांनी आज सामाजिक बांधिलकी जपत वाघामोडेवाडी आणि परिसरात सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटकाळात आपणही गावातील नागरिकांसाठी काहीतरी मदत करू शक्यतो या उदात्त हेतूने निर्जंतुकीकरण फवारणी फेस शिल्ड मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.

    तसेच आयसोलोशन सेंटरला ही मदत करणार असून कोरोना हद्दपार होईपर्यत उल्हास वाघमोडे व मित्र परिवाराचे वतीने मदत करणार असल्याचे सांगितले.कोरोनाची ही दुसरी लाट असून गावोगावी कोरोनाने कहर केला आहे. अशातच गावातील नागरिकांना चांगल्या पध्दतीचे फेस मास्क, सॅनिटायझर बॉटल व इतर सुविधा आपणही देऊन एक चांगले कार्य करू शकतो या भावनेतून उल्हास वाघमोडे व त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते.

    शासनाच्या नियमाचे पालन करून सॅनिटायझर निर्जंतुकीरण फवारणी, फेस शिल्ड मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले.हा उपक्रम राबविण्यासाठी वाघमोडेवाडी गावाचे सरपंच उमेश वाघमोडे , उपसरपंच दिनकर वाघमोडे, अमरजीत वाघमोडे, विशाल वाघमोडे, दत्ता सुळे, सचिन वाघमोडे,बापूराव शिंगटे, प्रतीक वाघमोडे, जीवन वाघमोडे, निलेश वाघमोडे, आशिष वाघमोडे, धीरज वाघमोडे, गणेश वाघमोडे, चेतन्य वाघमोडे,रवी कोकरे,कोशिक सुळे,आदिनी मोलाचे सहकार्य केल