कोरोना रुग्ण,नातेवाईक आणि निराधार गरजू लोकांना पुरविणार दोन वेळचे जेवण- म्हसवड नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

23
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.19मे):-कोरोनाने पीडित रुग्ण,त्यांचे नातेवाईक व निराधार लोकांना दोन वेळेचे जेवणाची सोय करून म्हसवड नगरपरिषदेने अनोखा उपक्रम राबविला आहे.सध्या महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजविला आहे त्याच बरोबर माण तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे असे असताना म्हसवड शहर हे 12 वाडी आणि 12 खेडी यांनी व्यापलेले आहे , सततचे लॉक डाउन, यामुळे सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे गावात फिरणारे भिकारी, मतिमंद,अनाथ लोकांना जेवण मिळण्याची भ्रांत पडली होती, अशातच म्हसवड नगरपरिषद ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपरिषद म्हणून ओळखली जाते या नगरपरिषदेतील मुख्याधिकारी,सर्व सदस्य आणि अधिकारी,कर्मचारी यांनी या सर्वांच्या जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेतला, अश्या प्रकारचा निर्णय घेणारी ही महाराष्ट्रातील बहुदा पहिलीच नगरपरिषद असावी.

म्हसवड हे 30000 च्या आसपास लोकसंख्या असणारे शहर आहे, कोरोनाने या सर्वांचे जगणे मुश्किल केले आहे.अश्या या वातावरणात कोरोनाने ग्रासलेले ऍडमिट असलेले पेशंट व त्यांचे नातेवाईक यांचे जेवणाचे हाल होत होते ते न पहावणारे होते त्यामुळे नगरपरिषदेने म्हसवड व परिसरात असणारी “कोविड हॉस्पिटल”ज्यामध्ये गलांडे हॉस्पिटल,जय भगवान हॉस्पिटल,संचित हॉस्पिटल,धन्वंतरी हॉस्पिटल, म्हसवड कोविड सेंटर,जनसेवा कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेले कोरोनाग्रस्त व त्यांचे नातेवाईक यांची 2 वेळेची जेवणाची सोय नगरपरिषदेच्या माध्यमातून आज पासून सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे तमाम महाराष्ट्रातून म्हसवड नागरपरिषदेचे कौतुक केले जात आहे. या कार्यक्रम प्रसंगी म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, मुख्याधिकारी डॉ.सचिन माने,नगरसेवक धनाजी माने,गणेश रसाळ,गोविंदराजे राजेमाने,जगन्नाथ लोखंडे,अनिल रोकडे, डॉ.गावडे,आप्पासो पुकळे, व म्हसवड मधील सुजाण नागरिक उपस्थित होते.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणाले म्हसवड मधील कोरोना पेशंट व त्यांचे नातेवाईक यांचे सर्वत्र कडक लॉक डाउन असलेने होणारे हाल न बघवणारे होते तसेच गावातून फिरणारे मनोरोगी ,वेडसर, अनाथ लोकांचे हाल बघून ते सहन न झालेने आम्ही त्यांची 2 वेळची जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.आज आम्ही नगरपरिषदेच्या माध्यमातून 60 लोकांना जेवण दिले आहे जे कोणी गरजू निराधार असतील त्यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी गणेश म्हेत्रे,बाबुराव शिंदे,रज्जाक मुल्ला यांच्याकडे आपले नाव द्यावे त्यासनुसार आपल्याला दोन्ही वेळचे जेवण पोहोच केले जाईल.