उपजिल्हा रुग्णालयास २०० बेड व ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याकरिता लोकसहभागातून मदत करण्यास दर्शवली तयारी

    37

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.19मे):-शहरातील राजकीय नेते व समाजसेवक तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
    या निवेदनात उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे सर्व सुविधा युक्त २०० बेड चे रुग्णालय तयार करून कोविड च्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी करा शासनाद्वारे सुविधा पुरविणे जमत नसेल तर आम्हीलोकसहभागेतून हिंगणघाट मधील जनते करिता ऑक्सिजन सिस्टम युक्त २०० बेड ची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालयात करून देण्यास तयार आहेत किमान याची तरी परवानगी शासनाने द्यावी तसेच स्टाफ की नुसार रुग्णालयात पूर्तता करून डेपुटेशन वर गेलेले डॉक्टर परत बोलवण्यात यावे.

    तसेच रुग्णालय प्रशासनाला कोणत्याही मदतीची आवशक्यता असेल तर ती लोकसहभागातून पूर्ण तयारी राजकीय नेते व समाजसेवकानी दर्शवली तसेच ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प आम्ही लोकसहभागातून आम्ही रुग्णालयात निर्माण करून देतो प्रशासनाने तसी जागा देऊन तो प्रकल्प सांभाळावा या चर्चेत हा सुद्धा प्रस्ताव देण्यात आला पण प्रशासनाने या प्रस्तावाला सुद्धा नकार दिला. *परंतु वैदकिय अधिक्षक व उपविभागीय अधिकारी यांनी ५० बेड ऑक्सीजान युक्त वाढ वण्याची ग्वाही दिली पण वाढते रुग्ण पाहता २०० बेड ची फार गरज असल्याने ते काम एक तर आम्हाला करू द्या अन्यथा तुम्ही करा असा सवाल राजकीय नेते व समाजसेवकांनी प्रशासनाला केला.

    हिंगणघाट शहरातील राजकीय नेते व समाजसेवक आपसी मतभेद दूर ठेऊन हिंगणघाट शहरातील जनतेचा उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक रुग्णांचा आरोग्य सेवेत कोणतीही कमतरता राहायला नको या मागणीकरिता सर्वांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी यांना ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, समाजसेवक सुनील डोंगरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजू खुपसरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष रफिकभाई, वणा नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. निर्मेश कोठारी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुनोत, शहराध्यक्ष सतीश ढोमने, मनसे जिल्हाउपाध्यक्ष अमोल बोरकर, समाजसेवक हितेंद्र हेमाके, मनसे जिल्हा सचिव सुनील भुते, आरोग्य सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेवारे,धनंजय बकाने, दिनेश वर्मा, जगदीश वांदिले, मयुर मांनधनिया इत्यादी यावेळी उपस्थित होते.