माण तालुक्यात बुद्धपौर्णिमा विविध ठिकाणी साधेपणाने साजरी

74

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.26मे):-तथागत भगवान बुद्ध यांची २५६५ वी जयंती माण तालुक्यात विविध ठिकाणी कोविडं 19 चे सर्व नियम पाळत साधेपणाने साजरी करणेत आली.म्हसवड येथे बुद्धविहारात बौद्धाचार्य कुमार सरतापे यांनी बुद्धपूजा घेतली यावेळी धम्मबांधवांना त्रिशरण पंचशील देणेत आले.

तसेच सिद्धार्थनगर म्हसवड येथे तेथील धम्मबांधवांनी बुद्ध पूजा घेतली छोटेखानी कार्यक्रम घेणेत आला.यावेळी माजी नगरसेवक युवराज सूर्यवनशी,सामाजिक कार्यकर्ते महादेव सरतापे,पांडुरंग सरतापे,रणजित सरतापे,उपस्थित होते.
शिंदी बुद्रुक येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त गरीब गरजू लोकांना शिधावाटप करणेत आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण खरात,धम्मबांधवाची उपस्थिती होती.याचबरोबर हिंगणी,वरकुटे मलवडी,देवापुर,मलवडी,दहिवडी आदी ठिकाणी बुद्धपौर्णिमा कोविडं 19 चे सर्व नियम पाळत साधेपणाने साजरी केली.